पंतप्रधान तावडेंना म्हणाले, ``तुमच्याकडून मला अनेक अपेक्षा!``

विनोद तावडे यांनी आज (ता. २९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Nodi) यांची भेट घेतली.
Narendra Nodi, Vinod Tawde
Narendra Nodi, Vinod Tawdesarkarnama

मुंबई : माजी मंत्री भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पक्षाने नुकतीच राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर तावडे यांनी आज (ता. २९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांची भेट घेतली.

Narendra Nodi, Vinod Tawde
शिवसेनेला निमंत्रण द्यायला काँग्रेस विसरली...

या भेटीदरम्यान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर कशा पध्दतीने प्रभावी काम करता येईल याबाबत तावडे यांना मार्गदर्शन केले. पक्षाकडून राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अनेक अपेक्षा तुमच्याकडून आहेत, असे मोदी यांनी विनोद तावडे यांना सांगितले.

तुमच्या राजकीय जीवनामध्ये जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून मिळालेली जबाबदारी ही एक मोठी संधी असून त्याचे तुम्ही सोने कराल, असा विश्वास मोदी यांनी तावडे यांच्याशी बोलतांना व्यक्त केला. पंतप्रधानांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना तावडे यांना सांगितले की, केवळ निवडणुकांचे राजकारण आपल्याला करायचे नसून खऱ्या अर्थाने सत्तेची फळे सामान्य, गोरगरीब माणसापर्यंत कशी पोहचवता येतील यासाठी अधिक परिश्रम घेतले पाहिजेत.

Narendra Nodi, Vinod Tawde
बावनकुळेंचे टेन्शन गेले : ३३४ मतदार सहलीला पाठवले...

त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनासुध्दा प्रेरित केले पाहिजे. भाजप सत्तेत उपभोग भोगण्यासाठी नसून सत्ता हे जनसेवेचे साधन म्हणून कसे प्रखरपणे वापरता येईल, यासाठी तुमचे कौशल्य पणाला लावा, असे पंतप्रधानांनी तावडे यांना सांगितले. माझ्या राजकीय आयुष्यातील सर्व अनुभव, कर्तृत्व व कौशल्य पणाला लावून पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन, असे तावडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com