Video : काँग्रेस आमदाराचा प्रताप, स्टेजवरच महिलेला घातला हार अन् केला फ्लाईंग किस

Congress MLA : व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Congress MLA
Congress MLA Sarkarnama

Congress MLA : काँग्रेस पक्षाचे एक नेते व आमदार यांनी स्टेजवर एका महिलेला फुलांचा हार घातला व फ्लाईंग कीस दिल्याचा प्रकार आता समोर येत आहे. ताराप्रसाद बहिणीपती (Taraprasad Bahinapati) असं या काँग्रेस आमदाराचे नाव आहे. यांनी हा प्रकार केला आहे. या आमदाराने ज्या महिलेला फ्लाईंग कीस दिला, ती त्यांचीच पत्नी असल्याचं बोलेले जात आहे. मात्र आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Congress MLA
Fadanvis : `समृद्धी` मुंबईला जोडला जाईल, तेव्हा जालना-औरंगाबादची प्रगती थांबणार नाही..

व्हायरल झालेला हा व्हिडीओ २९ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओत काँग्रेस पक्षाचं बॅनर दिसत आहे. या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना, इतरही अनेक काँग्रेस नेते या ठिकाणी हजर असल्याचं व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही मजेशीर प्रतिक्रीया ही या ठिकाणी वाचायला मिळत आहेत.

Congress MLA
Raj Thackeray : 'कोणत्या मुद्दयावर बाळासाहेबांशी झाले होते मतभेद?' ; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!

तारा प्रसाद बहिणीपती हे विद्यमान आमदार असून, ओडीसा राज्यातील एका मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. जाहीर कार्यक्रमातून त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं आहे. व्हिडीओत त्यांच्या बायकोने त्यांच्याकडे रागाने पाहिल आहे. लोकांनी टाळ्या वाजवत त्यांना दाद दिल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in