Vice Presidential Election 2022 : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

. सत्ताधारी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.
Jagdeep Dhankhar | Vice President
Jagdeep Dhankhar | Vice President sarkarnama

नवी दिल्ली : भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड हे अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजयी झाले. 71 वर्षीय धनखड यांना पाहिल्या पसंतीची तब्बल 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते बाद झाली. लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी आज रात्री 7 वाजून 50 मिनीटांनी धनखड यांच्या विजयाची घोषणा अधिकृतरीत्या केली. त्यांच्या विजयामुळे लोकसभा व राज्यसभेचे पीठासीन अधिकारी एकाच राज्यातील (राजस्थान) असल्याचा, उंबराच्या फुलासारखा दुर्मीळ योगायोग जुळून आला आहे. वर्तमान लोकसभा सभापती ओम बिर्ला हे कोटाचे खासदार असून धनखड यापूर्वी झुनझुनूतून संसदेवर (लोकसभा) निवडून आले होते. 1974 पासून सुरू असलेल्या धनखड यांच्या सार्वजनिक जीवनाची यात्रा उपराष्ट्रपतीपदापर्यंत येऊन ठेपली. धनकड यांच्या रूपाने आणखी एका ओबीसी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. या निवडणुकीसाठी फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदारांनाच मतदानाचा अधिकार असतो. सध्या संसदेची एकूण खासदारसंख्या 788 आहे. मात्र राज्यसभेतील 8 राष्ट्रपतीनियुक्त सरकारची पदे मोदी सराकरने न भरल्याने प्रत्यक्ष मतदारांची संख्या 780 होती. त्यापैकी 725 खासदारांनी (99.94% ) मतदान केले. 55 खासदारांनी मतदान केले नाही. यात तृणमूल काँग्रेसच्या 34, शिवसेना व स. पा. च्या प्रत्येकी 2, बसपाच्या खासदारांचा समावेश आहे. मतदानही धड न करता आलेल्या किमान 15 खासदारांची नावे लगेच समजू शकली नाहीत.

विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरुर, जयराम रमेश यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी केले मदतान केले.

धनखड यांना इतर पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बीजेडी, वायएसआरसी, बसपा, तेदेपा, अकाली दल आणि शिंदे गटाचाही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या पक्षांचे 81 खासदार आहेत. भाजपकडे स्वतःचे 394 खासदार आहेत. हा आकडा बहुमताच्या आकड्याहून जास्त आहे. त्यामुळे धनखड यांचा विजय पक्का आहे. दुसरीकडे, एनडीएचे संख्याबळ पाहिले तर सत्ताधारी आघाडीचे एकूण 441 खासदार आहेत. त्यांना 5 नामांकित सदस्यांचीही साथ आहे. त्यामुळे धनखड यांच्या पारड्यात 446 मते पडण्याची शक्यता आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.सद्यस्थितीत लोकसभेत 543, तर राज्यसभेत 245 खासदार आहेत. वरिष्ट सभागृहातील 8 जागा रिक्त आहेत. म्हणजे इलेक्टोरल कॉलेज 780 खासदारांचे आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. टीएमसीचे 36 खासदार आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानात 744 खासदारच सहभागी होतील. ठरल्यानुसार एवढ्याच खासदारांनी मतदान केले तर 372 हा बहुमताचा जादुई आकडा असेल.

Vice Presidential Election 2022
Vice Presidential Election 2022sarkarnama

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. आजच मतमोजणी होणार असून निकालही जाहीर केला जाणार आहे. सत्ताधारी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतील. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मतदान व त्यानंतर तत्काळ मतमोजणी होईल. त्यामुळे आजच्याच तारखेत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळणार हे निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com