चांगले कपडे घालण्यावरून दोन मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

साधेपणाने राहणारे चन्नी हे स्वत:ला आम आदमी म्हणवून घेतात. परंतु, मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर 15 दिवसांतच त्यांना नवा वाद ओढवून घेतला आहे.
Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal
Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal

नवी दिल्ली : चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा हाती घेतली आहे. साधेपणाने राहणारे चन्नी हे स्वत:ला आम आदमी म्हणवून घेतात. परंतु, मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर 15 दिवसांतच त्यांना नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कपड्यावरुन टोमणा मारला असून, यावरून दोघांमध्ये जुंपली आहे.

आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. केजरीवाल यांनी नुकताच पंजाब दौरा केला होता. यानंतर चन्नी यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, केजरीवाल यांना अडीच लाख रुपयांचे वेतन मिळते. तरीही ते चांगले कपडे परिधान करीत नाहीत. केजरीवाल यांना कपडे खरेदीसाठी कुणीतरी 5 हजार रूपये द्यावेत. त्यांच्याकडे सूट-बूट नाही का?

Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal
येडियुरप्पा काँग्रेसला देणार धक्का! अनेक आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट

याला केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी काही मुद्दे उपस्थित करीत चन्नी यांना जाब विचारला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चन्नी साहेब माझे कपडे तुम्हाला पसंत नसतील. परंतु, तो काही विषय नाही. जनतेला ते पसंत आहेत. कपड्याचा विषय सोडा आणि सांगा की हे आश्वासने कधी पूर्ण करणार? प्रत्येक बेरोजगाराला नोकरी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, कलंकित मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई ही आश्वासने कधी पूर्ण करणार आहात.

दरम्यान, चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा रूबाब आवडेनासा झाल्याचे नुकतेच म्हटले होते. मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांना दोन कोटी रुपयांची आलिशान कार मिळाली आहे. याचबरोबर त्यांच्याभोवती 1 हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कडे आहे. यामुळे त्यांना आता कैदेत असल्याची भावना वाटू लागली होती. या सगळ्या गोष्टींची गरज नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मुख्यमंत्री चन्नी पोलिसांनी त्यांची सुरक्षा कमी करण्याची सूचना केली होती. माझ्या सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमणे म्हणजे मनुष्यबळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. माझ्या जिवाला कोणताही धोका नसून, मी एक सर्वसामान्य माणूस आहे. प्रत्येक पंजाबी नागरिक हा माझा भाऊ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal
व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मंत्र्याचा मुलगा अडचणीत

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी नुकताच झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com