खासदारांचं वागणं पाहून वेंकय्या नायडूंना रडू आवरलं नाही!

कृषी कायदे व पेगॅसस प्रकरणावरून संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी गदारोळ घातला आहे.
Venkaiah Naidu Breaks Down over Parliament Chaos
Venkaiah Naidu Breaks Down over Parliament Chaos

नवी दिल्ली : कृषी कायदे व पेगॅसस प्रकरणावरून संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी गदारोळ घातला आहे. त्यामुळे लोकसभेसह राज्यसभेचे कामकाजात सातत्याने अडथळे येत आहेत. त्यातच काही खासदारांकडून असंसदीय कृत्य करण्यात आल्याने त्याची निंदाही होत आहे. राज्यसभेत मंगळवारी दोन खासदारांच्या कृतीने राज्यसभेचे सभापती यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. (Venkaiah Naidu Breaks Down over Parliament Chaos)

काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी टेबलवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. बाजवा यांनी रूलबुकही फेकून दिले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर नायडू यांनी या कृतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'ज्या पध्दतीने दोन सदस्य टेबलवर चढले त्याने मी खूप व्यथित झालो आहे. मी रात्रभर झोपू शकलो नाही.' हे बोलत असताना नायडू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

या घटनेमुळे राज्यसभेची पवित्रता संपली आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल. काही सदस्य अधिवेशन काळात वाईट पध्दतीने वागले आहेत. विरोधी सदस्यांकडून कोणत्याही विषयावर चर्चा केली जाऊ शकते, त्यावर वेगवेगळे मत असू शकते. पण ज्या पध्दतीने गोंधळ घालण्यात आला, ते योग्य नाही, असेही नायडू म्हणाले. नायडू बोलत असतानाही विरोधी सदस्यांकडून गोंधळ सुरूच होता. 

दरम्यान, सत्ताधारी खासदारांनी मंगळवारी केलेल्या कृतीचा निषेध केला आहे. तसेच बाजवा व संजय सिंग यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहे. या खासदारांविरोधातील प्रस्ताव संसदेच्या नैतिक समितीकडे पाठवला जाऊ शकतो. या घटनेनंतर वरिष्ठ मंत्र्यांनी नायडू यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही राज्यसभेत तृणमूलच्या खासदारांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हातातील कागद हिसकावून घेत फाडले होते. त्यांच्यावर अधिवेशन काळातपुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

संसदेचे अधिवेशन आता शेवटच्या टप्प्यात आहे. पण अधिवेशनाचा एकही दिवस गोंधळाशिवाय पार पडलेला नाही. त्यामुळे गोंधळातच सरकारकडून अनेक विधेयक संमत करण्यात आली आहेत. याला अपवाद 127 व्या घटनादुरूस्तीचे विधेयक ठरले आहेत. या विधेयकाच्या चर्चेदरम्यान मंगळवारी सर्व पक्षाच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत ते बहुमताने पारित केले. आज हे विधेयक राज्यसभेत संमत होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com