Sharad Pawar ,Narayan Rane
Sharad Pawar ,Narayan Ranesarkarnama

NCP : पवार साहेब तुमचं चुकलंच ! ; नारायण राणेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं उपरोधिक प्रत्युत्तर

NCP : 'लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यायची तुम्हाला काय गरज होती,'

पुणे : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प (vedanta foxconn) गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी काल (गुरुवारी) या विषयावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं होत. राणेंच्या टीकेला आज राष्ट्रवादीनं सडेतोड उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीनं आपल्या टि्वट हॅडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा।" आदरणीय शरद पवार साहेबांसारखा लोकनेता होणे नाही," अशी टॅगलाइन या व्हिडिओला देण्यात आली आहे.

"शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्यांच्या काळात राज्यात औद्योगिक क्रांती का झाली नाही," असा सवाल नारायण राणे यांनी केला होता.उद्योगक्षेत्रात शरद पवार यांनी केलेल्या कामाचा आढावा या व्हिडिओमधून घेतला आहे. राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांनी पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar ,Narayan Rane
Vedanta-Foxconn प्रकल्पाबाबत बैठकीचे इतिवृत्तच टि्वट करीत ठाकरेंचा सामतांवर हल्लाबोल

पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी, चाकण, शिरवळ, नवी मुंबई येथे उभारलेले मोठ-मोठ्या उद्योग प्रकल्पांची यात माहिती देण्यात आली आहे. 'लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यायची तुम्हाला काय गरज होती,' असा खोचक सवाल या व्हिडिओमधून विचारण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राणे माध्यमांशी बोलत होते.

“अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हते, म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता. समर्थ आहोत आम्ही. सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला”, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.

शरद पवार यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘आम्ही सत्तेत असताना मला मंत्रालयात रोज देशातल्या आणि देशाबाहेरच्या गुंतवणूकदारांशी बोलण्यासाठी वेळ काढायला लागायचा. आता वाद थांबवूया’, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in