भाजप खासदारानेचं केंद्रीय मंत्र्यांना आणलं अडचणीत; 'तो' थरारक व्हिडीओ केला शेअर

या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
भाजप खासदारानेचं केंद्रीय मंत्र्यांना आणलं अडचणीत; 'तो' थरारक व्हिडीओ केला शेअर
Lakhimpur Kherisarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्याने काल ३ ऑक्टोबर रोजी आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ भाजप खासदार वरुन गांधी (Varun Gandhi) यांनी ट्वीट केला आहे. (Varun Gandhi shared a video of the incident at Lakhimpur Khiri)

Lakhimpur Kheri
नवाब मलिकांनी मध्यरात्री टाकलेल्या ट्विटबॉम्बने एनसीबीसह भाजप अडचणीत

आपल्या ट्वीटर वरुन गांधी यांनी व्हिडीओ शेअकर करत म्हटले आहे की, लखीमपूर खिरीमध्ये जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणालाही हादरवून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या वाहनांचे मालक, त्यांमध्ये बसलेले लोक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Lakhimpur Kheri
पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले!

शेतकरी शांतता मय मार्गाने आंदोनल करत होते. त्यावेळी दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता. या घटनेचा नवीन व्हिडीओ वरुन गांधी यांनी शेअर केला आहे. यामध्ये शेतकरी रस्त्याने चालेले असताना अचाण पणे दोन मोटारींनी त्यांना चिरडल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.