वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे १२ भाविकांचा मृत्यू; पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

जखमींवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
vaishno devi

vaishno devi

sarkarnama

नवी दिल्ली : नववर्षाच्या पूर्वसंध्येला वैष्णोदेवी (vaishno devi) माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतत आहेत. मृतांमध्ये दिल्ली (Delhi), हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश, असल्याची माहिती आहे.

<div class="paragraphs"><p>vaishno devi</p></div>
पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बॅड न्यूज; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

जखमींवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार तर १३ जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, काही जणांमध्ये वाद झाल्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.

<div class="paragraphs"><p>vaishno devi</p></div>
चिंता वाढली: राज्यात आज दिवसभरात आढळले ८ हजार कोरोना रुग्ण

या घटने संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, माता वैष्णो देवी भवनात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. देव जखमींना लवकरात लवकर बरे करो. मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो आहे. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०, ००० रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com