पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्र्याच्या घरावरच चिकटवली नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्र्याच्या घरावरच समन्स चिकटवले आहे.
पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्र्याच्या घरावरच चिकटवली नोटीस
Police paste notice on union minsiter of state Ajay Mishra House

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झालेली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयानेही भाजप सरकारला धारेवर धरले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी (Police) थेट केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या घरावर धडक मारत नोटीस चिकटवली.

या प्रकरणात पोलिसांनी लव कुश आणि आशिष पांडे या दोघांनी अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने गदारोळ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल दणका दिल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी थेट मिश्रांच्या घरावरच नोटीस चिकटवली. आशिष याने चौकशीसाठी हजर राहावे, अशी ही नोटीस होती. परंतु, अटकेच्या भीतीने तो चौकशीला हजर राहिला नाही. त्याच्यावर काय कारवाई पोलीस करतात, याकडे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, या प्रकरणी आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली याचा अहवाल उद्या न्यायालयात सादर करावा. आतापर्यंत या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेले ८ जण कोण होते याची सविस्तर माहिती सादर करावी. ते शेतकरी होते, पत्रकार होते अथवा इतर कोण होते? ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुम्ही कुणावर गुन्हा दाखल केला याचीही माहिती आम्हाला द्या.

Police paste notice on union minsiter of state Ajay Mishra House
भाजप प्रवेशानंतर सहा महिन्यांतच मिथुनदांना मिळालं मोठं गिफ्ट

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा समावेश होता. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष हा मोटार चालवत होता आणि त्यानेच शेतकऱ्यांना चिरडल्याचा दावा करण्यात आला असून, पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या प्रकरणात त्याला अद्याप अटक झालेली नाही.

Police paste notice on union minsiter of state Ajay Mishra House
स्मृती इराणी, जोतिरादित्य शिंदेंचं आधी सरकारमध्ये अन् आता पक्षात वाढलं वजन

लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात होते. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.