उत्तर काशीमध्ये मोठा अपघात; बस दरीत कोसळून २२ भाविकांचा मृत्यू

Madhya Pradesh | Uttarakhand Bus Accident : यात्रेवर गेलेल्या २२ भाविकांचा मृत्यू
Uttarakhand Bus Accident
Uttarakhand Bus AccidentSarkarnama

(Madhya Pradesh | Uttarakhand Bus Accident)

देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. आज संध्याकाळी २८ भाविकांना घेवून जाणारी बस एनएच-९४ हायवेवर डामटापासून दोन किमी पुढे जानकी चट्टीजवळ खोल दरीत कोसळली. यात २२ भाविकांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि SDRF चे जवान पोहचले असल्याची माहिती DGP अशोक कुमार यांनी दिली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील २८ भाविकांना घेऊन बस यात्रेवर गेली होती. मात्र आज संध्याकाळी डामटापासून दोन किमी पुढे जानकी चट्टीजवळ आल्यानंतर वळणाला चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली. यात २२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ६ जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच याबाबत्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून घटनास्थळी मदतकार्य वेगात पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिस्थितीवर आपण स्वतः लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले असून मृतांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच आपण आणि आपली टीम उत्तराखंड सरकारच्या सातत्याने संपर्कात असून जखमींच्या उपचारांसाठी मध्यप्रदेश सरकार पूर्ण मदत करत असल्याचे सांगितले आहे. शिवाय २२ मृतदेह मध्यप्रदेशमध्ये आणण्याची व्यवस्था सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com