उत्तराखंडमध्ये भाजपकडून वादग्रस्त 'चॅम्पियन' आमदाराला डच्चू ; पत्नीला तिकीट

कुंवर प्रणव सिंह आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. त्यांच्या वादग्रस्त वागण्यामुळे त्यांना २०१९ मध्ये काही काळासाठी भाजपने पक्षातून निंलबित केले होते.
Kunwar Pranav Singh
Kunwar Pranav Singhsarkarnama

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने (bjp) आपल्या ५९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात ५ महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खटीमा येथून तर प्रदेशाध्यक्ष मदन कैाशिक हे हरिव्दार येथून निवडणुक लढविणार आहेत. मात्र, भाजपचे वादग्रस्त आमदार 'चॅम्पियन' कुंवर प्रणव सिंह (Kunwar Pranav Singh) यांचा पत्ता भाजपने कट केला आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिलं आहे.

कुंवर प्रणव सिंह आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. त्यांच्या वादग्रस्त वागण्यामुळे त्यांना २०१९ मध्ये काही काळासाठी भाजपने पक्षातून निंलबित केले होते. एक वर्षांनंतर ते पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले. वादग्रस्त विधान, शस्त्रांसोबत समाजमाध्यमांवर फोटो शेअर करणे, भाजपचे आमदार देशराज कर्णवाल यांच्याशी झालेला वाद, पत्रकारांना शिवीगाळ अशा अनेक प्रकरणामुळे त्यांना २०१९मध्ये भाजपने घरचा रस्ता दाखविला होता.

Kunwar Pranav Singh
धक्कादायक : मोदी म्हणाले, बेटी बचाव, बेटी पटाव,’ नेटकऱ्यांचा हल्लाबोल

जून २०१९ मध्ये समाजमाध्यमांवर हातात शस्त्र असलेल्या त्यांचा फोटो त्यांनी शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. या दरम्यान कुंवर प्रणव सिंह यांनी एका पत्रकाराला धमकी दिली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तत्कालीन प्रभारी श्याम जाजू यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले होते. आँगस्ट २०२० मध्ये भाजपने त्यांना माफ करुन पुन्हा पक्षात घेतलं होते.

Kunwar Pranav Singh
लाडका भाचा स्वर्णवची भेट अपूर्णच ; आत्याचा अपघाती मृत्यू

आमदार देशराज कर्णवाल आणि त्यांच्यातील शाब्दीक वाद अनेक वर्ष सुरु होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कुंवर यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितले होते. त्यावरुन खासदार रमेश पोखरिया यांच्यावर त्यांनी टीका केली होता. त्यांना 'प्रवाशी पक्षी' असे म्हणून हिणवलं होत. 'चॅम्पियन' कुंवर प्रणव सिंह हे २०१६ मध्ये कॉग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. यावेळी कॉग्रेसचे नऊ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com