Uttarakhand Assembly : बिपीन रावत यांच्या कन्येला भाजपची ऑफर

बिपीन रावत यांची मोठी कन्या कृतिका या मुंबईत राहतात. त्या विवाहित आहेत. तर लहान कन्या तारिणी या दिल्ली उच्च न्यायालयात वकील आहेत.
Uttarakhand Assembly : बिपीन रावत यांच्या कन्येला भाजपची ऑफर
sarkarnama

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly elections) कॉग्रेस आणि भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत काही जागा दोन्ही पक्षांनी अद्याप जाहीर केलेल्या नाही. लवकरच येथील उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. उत्तराखंडमध्ये कडवी झुंज देण्यासाठी कॉग्रेस आणि भाजपनं कंबर कसली आहे. येथे आम आदमी पार्टीनेही जोरात तयारी सुरु केली आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत (vipin rawat) यांच्यासह लष्करातील ११ अधिकऱ्यांचे निधन झाले. रावत यांच्या एका कन्येला भाजप उत्तराखंडच्या निवडणुकीत उतरविणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भाजपनं त्यांना पाठविला आहे. सेवानिवृत्तीनंतर उत्तराखंड येथे राहण्याची इच्छा रावत यांनी व्यक्त केली होती. त्यांनी डेहरादून येथे घरही घेतली होते. पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिलं. भाजप (BJP)आता त्यांच्या मुलीला येथून तिकीट देण्याच्या विचारात आहे.

Uttarakhand Assembly : बिपीन रावत यांच्या कन्येला भाजपची ऑफर
शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहे का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

काही दिवसापूर्वी स्वर्गिय बिपीन रावत यांचे बंधू कर्नल विजय रावत यांनी देहरादून येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. यामुळे भाजपने बिपीन रावत यांच्या दोन्ही कन्यांना निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सुत्रांनी सांगितलं. रावत यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एकीला भाजप तिकीट देणार आहे. मात्र अद्याप निवडणूक लढण्याबाबतचा होकार या दोन्ही मुलींकडून आलेला नाही. त्यांच्या होकाराची प्रतीक्षा भाजपला आहे.

बिपीन रावत यांची मोठी कन्या कृतिका या मुंबईत राहतात. त्या विवाहित आहेत. तर लहान कन्या तारिणी या दिल्ली उच्च न्यायालयात वकील आहेत. दोघीपैकी एका कन्येला भाजप देहरादून येथील डोईवाला किंवा कोटद्वार विधानसभेचे तिकीट देणार असल्याचे समजते. या दोन्ही जागांवर भाजपनं अद्याप कुणालाही तिकीट दिलेले नाही.

डोईवाला किंवा कोटद्वार हा परिसरात लष्कारातील रहिवाशांचा परिसर म्हणून डोईवाला, कोटद्वार हा परिसराची ओळख आहे. त्यामुळे रावत यांच्या परिवारातील एकाला येथून तिकीट देण्यासाठी भाजप आग्रही आहे. १४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेची निवडणूक होत आहे. उत्तराखंड येथे ८१ लाख ४३ हजार ९२२ मतदार आहेत. भाजप आणि कॉग्रेस मध्ये येथे कडवी लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com