काँग्रेसला मोठा धक्का! बालेकिल्ला रायबरेलीच्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
Rebel congress MLA Aditi Singh joins BJP. Sarkarnama

काँग्रेसला मोठा धक्का! बालेकिल्ला रायबरेलीच्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशात पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक पक्षांकडून इतर पक्षांचे आमदार फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. आता काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या रायबरेली (Rae Bareli) मतदारसंघातीलच आमदाराने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.

रायबरेलीतील आमदार आदिती सिंह या आज भाजपच्या गोटात सामील झाल्या. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लखनौमध्ये झाला. विधानसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आदिती सिंह यांनी मागील आठवड्यात थेट पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यावरच हल्लाबोल केला होता. काही काळापासून त्या काँग्रेसवरही टीका करीत होत्या. त्यामुळे त्या पक्ष सोडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ती खरी ठरली आहे. आदिती सिंह यांना मागील वर्षी पक्षाच्या महिला आघाडीतून डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून त्या पक्ष नेतृत्वावर नाराज होत्या.

Rebel congress MLA Aditi Singh joins BJP.
न्यायालये काम करताहेत पण सरकार नाही! सरन्यायाधीशांनी सुनावलं

रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोनिया गांधी करीत आहेत. हा लोकसभा मतदारसंघ 1980 पासून काँग्रेसने ताब्यात ठेवला आहे. फक्त 1996 आणि 1998 चा अपवाद त्यात होता. त्यावेळी भाजपचे अशोक सिंह विजयी झाले होते. रायबरेली विधानसभा मतदारसंघ मागील 6 निवडणुकांपैकी 4 वेळा काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. दोन वेळा म्हणजेच 2007 आणि 2012 मध्ये पक्षातून हकालपट्टी झालेले अखिलेश कुमार सिंह यांनी तेथून विजय मिळवला होता. आदिती या अखिलेश कुमार सिंह यांच्या कन्या आहेत.

Rebel congress MLA Aditi Singh joins BJP.
मोठी बातमी : सचिन वाझेनं आता परमबीरसिहांनाच आणलं अडचणीत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आमदार फोडाफोडी सुरू केली होती. त्यांनी बहुजन समाज पक्षाचे 6 आणि भाजपचा 1 आमदार फोडला होता. त्यानंतर भाजपने त्यांना जशास तसे उत्तर दिले होते. विधान परिषदेवरील समाजवादी पक्षाच्या चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. समाजवादी पक्षाच्या आमदार रमा निरंजन यांच्यासह चौघे भाजपमध्ये दाखल झाले होते. रमा निरंजन यांच्या पतीनेही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in