आईला औषधे देऊन येताना भाजप नेत्यावर गोळीबार ; प्रकृती गंभीर

दुचाकीवरुन येथून परत येत असताना भौगांव-मैनपुरी रस्त्यावर त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या.
आईला औषधे देऊन येताना भाजप नेत्यावर गोळीबार ; प्रकृती गंभीर
Gautam Katheria sarkarnama

मैनपुरी (उत्तरप्रदेश) : आईला औषधे देऊन घरी परत येत असताना भाजप नेत्यावर अज्ञान दोन व्यक्तींनी गोळीबार केला. ही घटना मैनपुरी (उत्तरप्रदेश) (Uttar Pradesh) येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

या हल्ल्यात भाजप नेता गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करुन हल्लेखोर पळून गेले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

भाजपा अनुसूचित जाती युवा मोर्चाचे जिलाध्यक्ष गौतम कठेरिया हे काल (शनिवारी) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या आईला औषधे देण्यासाठी मैनपुरी येथे गेले होते. त्यांची आई दुसऱ्या ठिकाणी राहते. दुचाकीवरुन येथून परत येत असताना भौगांव-मैनपुरी रस्त्यावर त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या.

Gautam Katheria
राज्यसभा निवडणुकीत चुका झाल्या त्या आता होणार नाहीत, अपघात नेहमीच होत नसतात !

यात ते गंभीर झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आगरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबारानंतर दुचाकीवरुन आलेले दोघे हे पळून गेले.

कठेरिया यांच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टारांनी सांगितले. या घटनेनंतर मैनपुरी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे, पोलिस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत.

Gautam Katheria
सुहास कांदे संशयाच्या भोवऱ्यात ; शिवसेनेकडून चौकशी सुरु, ही चूक झालीच कशी ?

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे (ncp) अध्यक्षाच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना काल उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. गोळीबाराचे कारण अद्याप कळू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in