UP Election Result : भाजप इतिहास घडवणार? सुरूवातीचे कल योगींच्या पारड्यात

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पण संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.
UP Assembly Election 2022 Live Updates |UP Election Results 2022 Live Updates
UP Assembly Election 2022 Live Updates |UP Election Results 2022 Live Updatessarkarnama

लखनौ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) मतमोजणी सुरू झाली आहे. पण संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. या राज्यात मागील 37 वर्षात कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. हा इतिहास पुसत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने (BJP) जोर लावला होता. मतमोजणीतील सुरूवातीचे कल पाहिल्यास भाजप इतिहास घडवणार असल्याचे दिसते. (UP Election Results 2022 Live Updates)

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू होती. यामध्ये भाजपला 125 ते 135 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. तर प्रमुख विरोधक असलेला समाजवादी पक्ष 70 ते 80 जागांच्या जवळपास आहे. बीएसपी आणि काँग्रेस (Congress) स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसत आले. त्यामुळे भाजपकडून यावेळी पुन्हा सत्ता मिळवत इतिहास घडवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतील, असं दिसत आहे.

एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) भाजपला दोनशेहून अधिका जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात दोन महिन्यांच्या कालावधीत सात टप्प्यांत निवडणूक झाली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सत्ताधारी भाजपमध्ये सामना पाहायला मिळाला. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढली असून, भाजपला 240 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 143, बहुजन समाज पक्षाला (BSP) 15 तर काँग्रेसला 5 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश एक्झिट पोल सरासरी -

भाजप - 240

समाजवादी पक्ष - 143

बहुजन समाज पक्ष - 14

काँग्रेस -5

मागील निवडणुकीतील स्थिती -

भाजप - 312 (अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) - 325

समाजवादी पक्ष - 47

बसपा - 19

काँग्रेस - 7

राष्ट्रीय लोकदल - 1

इतर - 4

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com