योगी आदित्यनाथ म्हणतात, उत्तर प्रदेशात चार वर्षात एकही दंगल नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले असून, राज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा केला आहे.
uttar pradesh cm yogi adityanath says no communal riots in state for last four years
uttar pradesh cm yogi adityanath says no communal riots in state for last four years

लखनौ : मागील चार वर्षांत राज्यात एकही दंगल झाली नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. आदित्यनाथ यांनी आज राज्य सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले. राज्य सरकारने चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला आहे. देशाचा राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, नव्या उत्तर प्रदेशच्या नव्या प्रवासाला एकत्र जावू, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यातील चकमकींबाबत विरोधकांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, गुन्हेगाराचा कोणताही धर्म नसतो. राज्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याने राज्यात दरोडा, बलात्कार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणे कमी झाली आहेत. उत्तर प्रदेश आता 'बिमारु राज्या'च्या प्रतिमेतून बाहेर पडले आहे. व्यवसायपूरक राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. सुरवातीला उत्तर प्रदेशात केंद्र सरकारच्या योजनांला स्थान नव्हते. या योजना लागू झाल्या असत्या तर राज्यात फार मोठा बदल घडला असता. पंतप्रधान घरकुल योजनेत राज्य पहिल्या स्थानी आहे, 

राज्य सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचा आलेख मांडताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मागील चार वर्षांत उत्तर प्रदेश राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून समोर आले आहे. 'जीएसडीपी'मध्ये देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून राज्याला विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे. भाजप २०१७ मध्ये सत्तेत आला त्यावेळी राज्यातील अनेक गावांत शाळा, रस्ते आणि विकास दिसतच नव्हता. काही आदिवासी क्षेत्रात तर मतदानाचा अधिकारही नव्हता. भाजपचे सरकार आल्यानंतर ते अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com