मुलींसाठी स्कूटी, सरकारी नोकरी; भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने आज (८ फेब्रुवारी) आपला जाहीरनामा घोषित केला.
UP Election 2022 manifesto released
UP Election 2022 manifesto released

लखनौ : उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने (bjp) आज (८ फेब्रुवारी) आपला जाहीरनामा घोषित केला. लोक कल्याण संकल्प पत्र 2022 या नावाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (UP election 2022 latest news)

'हे फक्त घोषणापत्र नसुन हे एक संकल्पपत्र आहे. उत्तर प्रदेशला नव्या भविष्याच्या दिशेने घेऊन जाणारं हे संकल्पपत्र आहे. हे घोषणापत्र फडकवत समाजवादी पक्षाचे नेते विचारल, यातील किती संकल्प पूर्ण झाले. यातील 212 संकल्प पूर्ण झाले आहेत, असं उत्तर मी त्यांना देऊ इच्छितो.

UP Election 2022 manifesto released
भगवं उपरणं घातलेल्या जमावाला मुस्लिम विद्यार्थिनी एकटीच भिडली! पहा व्हिडीओ

जाहीरनामा प्रसिद्ध करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारने सरकारच्या कल्याणकारी योजना राज्यातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवल्या आहेत. 2012 ते 2017 दरम्यान यूपीमध्ये 700 हून अधिक दंगली झाल्या. शेकडो लोक मारले गेले. अनेक महिने यूपीमध्ये कर्फ्यू होता. व्यापारी स्थलांतर करायचे आणि मुलींना शाळेत जाता येत नव्हते. आज ५ वर्षांनंतर यूपीतील दंगली संपल्या आहे. यूपीमध्ये आज कर्फ्यू नाही, पण कावड यात्रा मोठ्या जल्लोषात निघणार आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारमध्ये आता गरीब त्यांच्या उपचाराच्या खर्चातून मुक्त झाले आहेत. पंतप्रधानांच्या कृपेने आयुष्मान भारत' योजनेअंतर्गत यूपीच्या 07 कोटी नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. एकट्या जेवर परिसरातच 18,246 लोक या योजनेचा लाभ घेतला आहे.

'लोक कल्याण संकल्प पत्रा'साठी, 15 डिसेंबर 2021 रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आकांक्षा बॉक्स लॉन्च करून राज्यभरातून सूचना मागवल्या होत्या. उत्तर प्रदेश क्रमांक-1 'सूचना तुमच्या, संकल्प आमचा' या थीमवर आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 30 हजार ग्रामपंचायती, सर्व विधानसभा मतदारसंघ आणि महानगरांमधील विविध सामाजिक आणि आर्थिक वर्गातील लोकांशी संवाद साधून सूचना मागवण्यात आल्या. यासोबतच कॉल आणि ई-मेलद्वारेही सूचना घेण्यात आल्या.

UP Election 2022 manifesto released
सुप्रिया सुळे यांनी साखर कारखान्‍यांच्‍या विक्रीबाबतही बोलले पाहिजे : विखे पाटील

- सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल

- विधवांना 1500 रुपयांपर्यंत पेन्शन वाढ दिली ​​जाईल (सध्या 800)

- महिलांना होळी आणि दिवाळीला दोन सिलिंडर मोफत दिले जाणार

- ६० वर्षांवरील महिलांना सरकारी वाहतुकीत मोफत प्रवास

- विद्यार्थ्यांना 2 कोटी किंवा स्मार्टफोन देणार

- प्रत्येक घरात एका तरुणाला सरकारी किंवा स्वयंरोजगाराची संधी देणार

- महाविद्यालयीन मुलींना मोफत स्कूटी

- अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार

- गरीब मुलींच्या लग्नासाठी 25000 रुपये दिले जातील (आता 15000)

- सर्व सार्वजनिक आणि शैक्षणिक संस्थांजवळ सीसीटीव्ही बसवणार

- प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार

- 25 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील.

-UPSC, CLAT, NEET, TET, UPPSC, NDA ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल

- लव्ह जिहाद करणाऱ्यांना 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख दंड

- दिव्यांगांचे पेन्शन दरमहा 1500 रुपये करण्यात येणार

- सर्व बांधकाम कामगारांना मोफत विमा

- सर्व बांधकाम कामगारांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com