पर्रीकर पुत्र भाजप आणि त्यातही फडणवीसांची डोकेदुखी वाढवणार...

Goa Assembly Election : देवेंद्र फडणवीस आणि गोवा भाजपपुढे सुवर्णमध्य साधण्याचे मोठे आव्हान
Utpal Parrikar Manohar parrikar and devendra Fadnavis

Utpal Parrikar Manohar parrikar and devendra Fadnavis

Sarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे (Goa Assembly Election) वारे जोरात वाहत आहेत. भाजप, काँग्रेससह आम आदमी, तृणमूल काँग्रेस आणि सर्वच स्थानिक पक्षांनी या निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडला आहे. भाजपने या निवडणुकीची संपुर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिली आहे. मात्र फडणवीसांसाठी हि निवडणूक सोपी नसल्याचे चित्र आहे. कारण भाजपचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर होणारी हि पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.

अशातच आता खुद्द पर्रीकर पुत्रचं गोव्यात भाजपची डोकेदुखी वाढवणार आहेत. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल्ल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी गोव्यातील अत्यंत महत्वाच्या अशा पणजी विधानसभा मतदार संघातून पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. तशा आशयाचे त्यांनी थेट ट्विटच केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि गोवा भाजपपुढे सुवर्णमध्य साधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पणजीत उत्पल पर्रीकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारीचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी काल दिले आहेत. मात्र उत्पल पर्रीकर हे पणजीतून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी मागच्या काही दिवसांपासून त्या पद्धतीने तयारीही सुरु केली आहे. आपल्या वाढदिवसादिवशी त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला आहे. उत्पल यांनी उमेदवारीसाठी नुकतीच दिल्लीवारीही केली होती. यात त्यांनी पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांची भेट घेतली होती.

<div class="paragraphs"><p>Utpal Parrikar Manohar parrikar and devendra Fadnavis</p></div>
इंधनदरवाढीचा भडका; कझाकिस्तानमध्ये अध्यक्षांचे घरचं पेटवले...

मनोहर पर्रीकर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी पोटनिवडणूक लढवतील अशी अपेक्षा पर्रीकर समर्थकांनी व्यक्त केली होती. मात्र, भाजपने उत्पल पर्रीकर यांना राजकीय अनुभव नसल्याचे कारण देत शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहिर केला. पण त्यानंतर २०२० च्या शेवटाकडे येत असताना उत्पल्ल पर्रीकर यांनी आपण विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत पक्षाकडे तिकीटाची मागणी केली होती. मात्र भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस किंवा गोवा भाजप यांच्यापैकी कोणीही या मागणीकडे लक्ष दिले नव्हते.

पणजी मतदारसंघावर १९९४ पासून २०१९ असे सलग २५ वर्ष भाजपचे एकहाती वर्चस्व होते. मनोहर पर्रीकर यांचा हा बालेकिल्ला होता. २०१५ मध्ये पर्रीकर दिल्लीत गेल्यानंतर भाजपच्या सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी हा बालेकिल्ला शाबुत ठेवला होता. पुढे २०१७ मध्ये पर्रीकर गोव्याच्या राजकारणात परतल्यानंतर कुंकळयेकर यांनी पर्रीकरांसाठी राजीनामा देत जागा रिकामी केली. त्यावेळी हा मतदारसंघ पुन्हा पर्रीकरांकडे आला.

<div class="paragraphs"><p>Utpal Parrikar Manohar parrikar and devendra Fadnavis</p></div>
धक्कादायक : विमानातून उतरताच तब्बल 125 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मात्र, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रथमच २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बाबूश मोन्सेरात यांनी पणजीची जागा जिंकली. या निवडणुकीत मोन्सेरात यांच्याविरुद्ध सिद्धार्थ कुंकळयेकर उभे होते. पुढे काही दिवसांतच काँग्रेसच्या १० आमदारांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात मोन्सेरात आघाडीवर होते. मात्र पर्रीकर यांनी विधानसभेच्या मैदानात उडी घेतल्याने पणजीचे तिकीट कोणाला द्यायचे, निष्ठावंत कार्यकर्त्याला की बाहेरून आलेल्या आमदाराला? असा पेच गोवा भाजपपुढे आहे.

बाबूश यांना डावलणे भाजपला महागात पडणार, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर भाजपचे नेते देखील बाबूश यांनाच उमेदवारी देण्याच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. अशातच कालच्या मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्यामुळे बाबूश यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यावर उत्तर म्हणून उत्पल्ल यांनी ट्विट करत आता मागे हटणार नसल्याचे सांगत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाबूश कि पर्रीकर यांच्यातील सुवर्णमध्य साधण्याचे मोठे आव्हान देवेंद्र फडणवीस आणि गोवा भाजपपुढे निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com