अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी; एका दिवसातील रुग्णसंख्येनं मोडला जागतिक विक्रम

जगभरात ओमिकॉन रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Corona cases rise in America.

Corona cases rise in America.

Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिकॉन (Omicron) या नव्या प्रकाराने जगाची चिंता अधिक गडद केली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाची (Corona) जणू त्सुनामी (Tsunami) आली असून एका दिवसांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा विक्रम मोडला आहे. सोमवारी अमेरिकेत (America) तब्बल 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका दिवसात एवढ्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पहिल्यांदा आढळलेल्या ओमिक्रॉनने आता जगातील अनेक देशांना धडकी भरवली आहे. सर्वाधिक फटका अमेरिकेला बसू लागला आहे. या विषाणूचा अत्यंत वेगाने संसर्ग पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात अमेरिकेत एका दिवसांत सुमार 9 लाख 90 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. आठवडाभरातच हा आकडा दुप्पट झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Corona cases rise in America.</p></div>
कोरोनाची तिसरी लाट, मुख्यमंत्रीही पॉझिटिव्ह तरी सरकारचा धक्कादायक निर्णय

दोन वर्षांपूर्वी जगभरात महामारी सुरू झाल्यापासूनचा ही एका दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. मागील वर्षी अमेरिकेबाहेर एका दिवसात सर्वाधिक सुमारे 4 लाख 14 हजार रुग्ण आढळले होते. अमेरिकेतील अनेक जण घरी चाचणी करत असून त्याची नोंद सरकारकडे होत नसल्याने कोरोनाचा आकडा यापेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण रुग्णसंख्या वाढत असली तरी अद्याप मृत्यूचा आकडा आटोक्यात असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेन्शन या संस्थेने कोरोना रुग्णांचा विलीगीकरणाचा कालावधीत कमी करून पाच दिवसांवर आणला आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना रिपोर्ट आल्यानंतर केवळ पाच दिवस विलग राहावे लागेल. तसेच त्यांना बाहेर पडण्यापूर्वी कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट दाखवावा लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

<div class="paragraphs"><p>Corona cases rise in America.</p></div>
ज्योतिरादित्य शिंदेचे झाशीच्या राणीला नमन अन् नागपूरातील वंशजांनी मांडली व्यथा...

भारतातही मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या 1,71,830 एवढी आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.13 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत 11,007 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,43,06,414 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 37,379 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 68.24 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com