अन् जो बायडन यांनी केलं मास्क न घालण्याच्या नियमाचं स्वागत! - us president joe biden welcomes new covid 19 guidelines about masks | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

अन् जो बायडन यांनी केलं मास्क न घालण्याच्या नियमाचं स्वागत!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 एप्रिल 2021

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून, अनेक देश आता सुधारित नियमावली नागरिकांसाठी जाहीर करु लागले आहेत. 

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा कहर सुरू अनेक देशांत मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, आता अमेरिकेत नागरिकांना बाहेर जाताना मास्क घालण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र, यासाठी कोरोनाचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल. अमेरिका सरकारने नव्या नियमावलीला मंजुरी दिली आहे. या नियमावलीचे स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केले आहे. 

याविषयी अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने घोषणा केली आहे. संस्थेने म्हटले आहे की, कोरोनाचे पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना यापुढे बाहेर जाताना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. ते एकटे बाहेर पडणार असतील अथवा लस घेतलेल्या छोट्या समूहांत जाणार असतील, त्यांनी मास्क घालू नये. मात्र, ते गर्दीच्या ठिकाणी जाणार असतील तर त्यांनी मास्क वापरावा. आतापर्यंत अमेरिकेतील 9.5 कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. 

जो बायडन यांनी यांनी म्हटले आहे की, ही अतिशय चांगली प्रगती आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करुन दाखवले आहे की विषाणूचा प्रसार हा लसीकरणानंतर अतिशय कमी होतो. तुम्ही लस घेतली असेल तर भीती नाही. आतापर्यंत ज्या अमेरिकी नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी देशभक्ती दाखवण्यासाठी लस घ्यावी. लस ही तुमचा जीव वाचवण्यासाठी नसते तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा जीव वाचवण्याचे कामही ती करते. तसेच, रोजच्या सर्वसामान्य जगण्याकडे परतण्यासाठी लस घेणे महत्वाचे आहे. 

व्हाईट हाऊसच्या कोरोनाविषयक टास्क फोर्ससमोर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीडीसीची नवीन नियमावली मांडली आहे. या नियमावलीनुसार, छोटी किंवा मध्यम गर्दी असलेले कार्यक्रम लोक आता बाहेर आयोजित करु शकतात. फक्त यासाठी सर्वांना कोरोनाचे लसीकरण पूर्ण केलेले असायला हवे. हे कार्यक्रम आयोजित करताना त्यांना मास्क घालण्याची आवश्यकता असणार नाही. पूर्ण लसीकरण म्हणजे शेवटचा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख