Joe Biden News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भर कार्यक्रमात पाय अडखळून पडले; नेमकं काय घडलं?

US Air Force News: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या तब्येतीबद्दल दिली महत्वाची माहिती
Joe Biden News:
Joe Biden News:Sarkarnama

US News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे भर कार्यक्रमातच स्टेजवर पाय अडखळून पडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या हवाई दलात नवीन भरती झालेल्या जवानांना पदवी बहाल करण्यासाठी जो बायडेन यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी पदवीदान समारंभाच्या स्टेजवरच जो बायडेन हे पाय अडखळून पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन हवाई दलामध्ये नवीन भरती झालेल्या जवानांना पदवी बहाल करण्यासाठीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी तेथे भाषणही केले. बरोबरच तेथील जवानाला पदवी बहाल केली. तसेच अमेरिकेच्या हवाई दलाच्या एका अधिकार्‍याबरोबर हस्तांदोलनही केलं.

त्यानंतर बाजूला जाण्साठी पाऊल टाकताच जो बायडेन पाय अडखळून स्टेजवरच खाली कोसळले. मात्र, लगेच तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करत उठवलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Joe Biden News:
Solapur Politic's : भाजप नेत्याची प्रणिती शिंदेंना ऑफर; भविष्यातही त्यांनी पॉवरमध्येच राहावे

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पाय अडकून पडल्यानंतर या घटनेबाबत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने घडलेल्या घटनेनंतर ट्वीट करत जो बायडेन यांच्या तब्येतीबद्दल माहिती देत ते व्यवस्थित असल्याचं म्हटलं आहे.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com