अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडलं पण त्याआधी केलं मोठं काम... 

अमेरिकेनं तब्बल 20 वर्षांची अफगाण मोहिम गुंडाळत मंगळवारी पहाटे काढता पाय घेतला.
US military destroys hundreds of aircraft armed vehicles in Kabul
US military destroys hundreds of aircraft armed vehicles in Kabul

वॉशिंग्टन : अमेरिकेनं तब्बल 20 वर्षांची अफगाण मोहिम गुंडाळत मंगळवारी पहाटे काढता पाय घेतला. अमेरिकेच्या शेवटच्या विमानानं उड्डाण केल्यानंतर तालिबानने जोरदार जल्लोष केला. ही मोहिम संपवताना अमेरिकेनं महत्वाचं काम पार पाडलं आहे. सर्व सैन्याला मायदेशी नेताना अमेरिकेला अनेक लढाऊ विमानं, अत्याधुनिक लष्करी वाहनं, रॉकेट सुरक्षा यंत्रणा काबूल विमानतळावर सोडावी लागली आहे. पण ही सर्व यंत्रणा निकामी करण्यात आल्यानं तालिबानला त्याचा वापर करता येणार नाही. (US military destroys hundreds of aircraft armed vehicles in Kabul)

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा करत अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवल्याचा जाहीर केलं. त्यानंतर अमेरिकेला आपलं सैन्य 31 ऑगस्टपर्यंत बाहेर काढण्यास सांगितले. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर बहुतेक देशांनी आपले अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना मायदेशी हलवण्यास सुरूवात केली. यामध्ये अनेक अफगाण नागरिकांनीही देश सोडला. 

अमेरिकेसमोरच बाहेर पडण्याचे सर्वात मोठं आव्हान होतं. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीदरम्यानच अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी काही महिन्यांपासून या प्रक्रियेला सुरूवातही केली. पण मागील 20 वर्षांत अमेरिकेन लष्कराची शेकडो विमाने, वाहने, हजारो सैन्य अफगाणिस्तानात होते. अमेरिकेने मंगळवारी रात्री सर्व सैन्याला मायदेशी नेलं. पण अनेक विमानं, व वाहनं तिथंच सोडून द्यावी लागली आहेत. 

काबूल विमानतळावर 73 विमाने सोडून देण्यात आली आहेत. ही विमानेही निकामी करण्यात आली असून त्यांचा वापर पुन्हा कधीच करता येणार नाही. यातील बहुतेक विमानांची यंत्रणा आधीच खराब झाली होती. अफगाणिस्तानमध्ये सुमारे 100 अत्याधुनिक लष्करी उपकरणांनी सज्ज असलेली वाहनंही ठेवण्यात आली आहेत. ही वाहनंही निष्क्रिय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यातील एका वाहनाची किंमत सुमारे 10 लाख डॉलर एवढी आहे. 

विमानतळावर हायटेक रॉकेट डिफेन्स सिस्टिम होती. ही यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आली आहे. याच यंत्रणेनं सोमवारी विमानतळावर डागण्यात आलेल्या पाच रॉकेटला निकामी केले होते. अमेरिकन सैन्य व विमानांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा विमानतळावर बसवण्यात आली होती. आता ही यंत्रणाही निष्क्रिय करण्यात आली असून त्याचा पुन्हा वापर करता येणार नाही. अमेरिकेचे शेवटचे विमान उड्डाण करेपर्यंत हे काम सुरू होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com