अॅस्ट्राझेनेकाच्या लशीबाबत संभ्रम..कंपनीकडून कोरोना लशीच्या चाचण्यांची कालबाह्य माहिती?

ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना लशीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूटकडून घेतले जात आहे.
us agency says astrazeneca may have included outdated data
us agency says astrazeneca may have included outdated data

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीचा वापर जगभरातील अनेक देश करीत आहेत. या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. ही लस 79 टक्के परिणामकारक असल्याचे अमेरिका, चिली आणि पेरूमधील चाचण्यांमधून समोर आल्याचे अॅस्ट्राझेनेका कंपनीने जाहीर केले होते. कंपनीने लशीच्या चाचण्यांची कालबाह्य माहिती सादर केली असावी, अशी शंका अमेरिकेतील औषध नियामकांनी घेतली आहे. 

अॅस्ट्राझेनेकाने म्हटले आहे की, अमेरिका, चिली आणि पेरुमध्ये झालेल्या व्यापक चाचण्यांमध्ये लस 79 टक्के परिणामकारक असल्याचे समोर आल्याचे कंपनीने जाहीर केले होते. लस अनेक गंभीर आणि गुंतागुंतीचे आजार तसेच, रुग्णालयात दाखल रुग्णांसलाठी 100 टक्के सुरक्षित आहे. या लशीच्या चाचणीत तब्बल 32 बजार स्वयंसेवक सहभागी झाले होते आणि ते सर्व वयोगटातील होते, असे कंपनीने सांगितले होते. 

यावर अमेरिकेतील औषध नियामकांनी शंका उपस्थित केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजेस (एनआयएआयडी) या संस्थेने ही शंका व्यक्त केली आहे. संस्थेने म्हटले आहे की, अॅस्ट्राझेनेकाने लशीच्या चाचण्यांची माहिती सादर केली असून, त्यात कालबाह्य माहिती असावी. यामुळे लशीच्या परिणामकारकतेबाबत स्पष्टता येत नाही. त्यामुळे कंपनीने डेटा अँड सेफ्टी मॉनिटरींग बोर्डासोबत काम करुन लशीच्या परिमाणकारकतेची आकडेवारी तपासून घ्यावी. यातून जनतेला अतिशय अचूक आणि ताजी माहिती तातडीने उपलब्ध होईल. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर काही दिवसांपूर्वी थांबवला होता. काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे समोर आले होते. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला होता. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती आणि त्यातील 30 जणांना त्रास झाला होती. याची तपासणी युरोपियन मेडिसीन्स एजन्सीकडून (ईएमए)  तपासणी सुरू होती. 

अॅस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तिचा रक्ताचा गुठळ्या होण्याशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने नुकतीच केली. जागतिक आरोग्य संघटननेनही (डब्लूएचओ) ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. यानंतर युरोपीय देशांनी या लशीचा कोरोना लसीकरणासाठी पुन्हा वापर करण्यास सुरवात केली आहे. यात जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, लिथुआनिया, लॅटिव्हिया, स्लोव्हेनिया आणि बल्गेरिया या देशांचा समावेश आहे. 

आधी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी या लशीचा वापर थांबवला होता. त्यानंतर जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही लशीचा वापर थांबला होता. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया, लॅटिव्हिया या देशांनीही त्याचे अनुकरण केले होते. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला होता. आता ही लस सुरक्षित असल्याचे समोर आल्याने पुन्हा वेगाने लसीकरण सुरू झाले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com