Urmila Matondkar is known for soft porn Kangana's tongue slipped | Sarkarnama

उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नसाठी ओळखली जाते ?..कंगनाची जीभ घसरली

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते ? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना ? असा प्रश्न अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे.

मुंबई :  उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते ? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना ? असा प्रश्न अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाची जीभ घसरली आहे. काही दिवसापूर्वी ऊर्मिलाने कंगनावर टिका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने उर्मिलाबाबत अशी हीन भाषा वापरली आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर झालेली कारवाई ही चुकीची आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण कंगनाला पुरविण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा ही जनतेच्या पैशातून आहे. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी कंगना त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टिका उर्मिलाने कंगनावर केली होती. 
 
या पार्श्वभूमीवर कंगनाने उर्मिलावर निशाणा साधला आहे. उर्मिलाला निश्चितच तिच्या अभिनयासाठी कोणी ओळखत नाही. ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. तिला निवडणुकीचं तिकीट मिळू शकतं तर मला तिकीट का मिळणार नाही, असं कंगनानं मुलाखतीत म्हणाली. उर्मिलाने तिच्या मुलाखतीत माझा अपमान केल्याचा आरोप कंगनानं केला आहे.   

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे सेवन करणाऱे कोण कलाकार आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी कंगनाकडे उर्मिलाने केली होती. कंगनाने पुढे येऊन ही नावे कोणती आहेत. ते सांगावे.. या चित्रपट क्षेत्राला मदत करावी, त्यामुळे याला आळा कसा बसविता येईल. याचा विचार करावा, असं उर्मिलानं म्हटलं होतं.  

लाखों भारतीयांचं पोट मुंबई भरते. त्यांना प्रसिद्धी देते, मुंबईविषयी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजं. मुंबईची तुलना पाकिस्तानशी करू नये, असं टि्वट कंगनानं केलं होतं. सारा देश ड्रग्जमुळे त्रस्त आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचं उगमस्थान आहे, हे कंगनाला माहित आहे का, ड्रग्जच्या विरोधात कंगनाने तिच्या राज्यातून (हिमाचल प्रदेश) लढा देण्याची सुरवात केली पाहिजं असं उर्मिलानं एका मुलाखतीतं म्हटलं होतं. 
  
अंमली पदार्थांच्या पार्टीत सहभागी झालेल्या हिंदी चित्रपट कलाकारांविरोधात गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या पार्टीची चौकशी करून आघाडीच्या कलाकारांवर कारवाई कण्याची मागणी करणारे पत्र दिल्लीतील अकाली दलाचे माजी आमदार मनजिन्दरसिंह सिरसा यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) महासंचालक राकेश अस्थाना यांना दिले आहे.या पत्रानुसार 'एनसीबी'ने कारवाई केल्यास बडे कलाकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, दीपिका पदुकोन, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, वरून धवन, विकी कौशल व इतरांची नावे या तक्रारीत समाविष्ट आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांना 'एनसीबी'ने अटक केल्यानंतर यातून बरीच नावे पुढे आली आहेत. त्यातील काहींना ‘एनसीबी’ चौकशीला बोलविणार आहे. या पाश्‍र्वभूमीवर या पत्राने मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन सहीत आघाडीच्या कलाकारांची नावे या तक्रारीत असल्याने यास वेगळे महत्व आहे. चित्रपटसृष्टीतील या सर्व प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत हिने करण जोहर यांचे नाव वारंवार घेतले आहे. या तक्रारीतही जोहर यांचेच नाव प्रामुख्याने असल्याने कंगनाने केलेल्या आरोपांना एकप्रकारे पुष्टी मिळत आहे. कलाकारांच्या विरोधात तक्रारी होऊनदेखील त्यांना वारंवार कोण आणि कशासाठी वाचवत आहे, असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख