UPSC Result : 'यूपीएससी'त मुलींच्या यशाची गुढी उंच; 'टॉप फोर'मध्ये मारली बाजी !

Success of Girls in UPSC is High : महाराष्ट्राच्या यशाचे प्रमाण घटले..
Upsc result
Upsc result Sarkarnama

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएसीचा निकाल काल (दि.२४ मे) रोजी जाहीर झाला आहे. युपीएससीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली आहे.पहिल्या चार क्रमाकांवर मुली आल्या असून, यामध्ये इशिता किशोर हिने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ठाण्याची काश्मिरा संखे ही देशात पंचवीसावी तर राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यंदाच्या युपीएसी निकालात महाराष्ट्राच्या यशाचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. मागील वर्षाचा तुलना करता महाराष्ट्राचा यशाचा टक्का घटला आहे. तसेच पहिल्या शंभर उत्तीर्ण उमेदवारांमध्ये देखील महाराष्ट्राचा टक्का खालावला आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील उमेदवारांचा आकडा कमी झालेला आहे. यामुळे यंदाच्या युपीएसीच्या निकालात महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.

Upsc result
UPSC Results : गौरवास्पद! 'यूपीएससी'च्या निकालावर महाराष्ट्राची मोहोर ; 'एवढ्या' उमेदवारांनी मारली बाजी..

महाराष्ट्रातील ८५ उमेदवारांनी ‘यूपीएससी’च्या या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे १० टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. हे सर्व उमेदवार आता IAS, IPS किंवा इतर सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होणार आहेत.

Upsc result
UPSC Results : युपीएसीचा निकाल जाहीर; इशिता किशोर देशात पहिली, मुलींनी मारली बाजी..

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. इशिता किशोरने UPSC IS परीक्षेत 2022 मध्ये टॉप केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com