योगींनी करून दाखवलं! तब्बल सहा हजार भोंगे उतरवले अन् 30 हजार भोंग्यांचा आवाज केला कमी

मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
योगींनी करून दाखवलं! तब्बल सहा हजार भोंगे उतरवले अन् 30 हजार भोंग्यांचा आवाज केला कमी
Raj Thackeray, CM Yogi AdityanathSarkarnama

लखनौ : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंच्या घोषणेचं लोण देशभर पसरलं असून तेथील मुख्यमंत्र्यांनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार विरूध्द मनसे (MNS) आणि भाजप (BJP) असा राजकीय वाद रंगला आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घेणे बंधनकार केले आहे. याच पावलावर पाऊल टाकत योगी सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. पण त्यावरच न थांबता योगी सरकारने मागील काही दिवसांत विविध धार्मिक ठिकाणांवरील सहा हजारांहून अधिक भोंगे हटवले आहेत. तर 30 हजारांहून अधिक भोंग्यांच्या आवाजावर नियमानुसार निर्बंध लादले आहेत.

Raj Thackeray, CM Yogi Adityanath
राज ठाकरेंची हनुमान चालीसा तर अमित ठाकरेंची महाआरती!

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवरील परवानगी न घेतलेले भोंगे हटवण्याची मोहिम राज्यभर हाती घेण्यात आली आहे. तसेच इतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मान्यतेप्रमाणे आवाज ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत बुधवार दुपारपर्यंत सहा हजार 31 भोंगे हटवण्यात आले आहेत. सर्वाधित 1366 भोंगे वाराणसी विभागातील असून त्यामध्ये मेरठ, बरेली आणि कानपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात योगींनी याबाबत निर्णय घेतला होता. प्रत्येकाला आपल्या पध्दतीनुसार पुजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये, असं योगी यांनी म्हटलं होतं. दरम्यान, मुंबई पोलिसांनीही भोंग्यांबाबत नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मशिदी आणि मंदिरांना सुचना करण्यात आल्या असून दिलेल्या सुचनाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Raj Thackeray, CM Yogi Adityanath
नवनीत राणांच्या आरोपांविषयी आणखी एक सत्य समोर; न्यायालयात सांगितलं होतं...

बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या व नियमांचे पालन न करता बांधलेल्या मशिदी आणि मंदिरांना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही, तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करतील अशाच मंदिर व मशिदींना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल. तसेच ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात येणार आहे, असे मुंबई पोलिसांकडून सष्ट करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.