सातच्या आत घरात; नोकरदार महिलांबाबत योगी सरकारनं काढला आदेश

निर्णयाची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
सातच्या आत घरात; नोकरदार महिलांबाबत योगी सरकारनं काढला आदेश
UP CM Yogi Adityanath Latest Marathi NewsSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने नोकरदार महिलांसाठी महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे. महिलांना सायंकाळी सात ते सकाळी सहा यावेळेत काम करण्यासाठी जबरदस्ती करता येणार आहे. तसेच या कालावधीत महिलांनी काम करण्यास नकार दिल्यास त्यांना कामावरून काढता येणार नाही, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. (CM Yogi Adityanath Latest Marathi News)

महिलांच्या सुरक्षेच्यादृष्ट्रीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. सरकारने दोन दिवसांपर्वी तसा काढला आहे. सर्व आस्थापनांमध्ये या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे आता यापुढे उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सायंकाळी सात नंतर महिलांना कोणत्याही आस्थापनांमध्ये काम करण्यासाठी थांबण्याचे बंधन राहणार नाही.

UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
सांगलीत राष्ट्रवादी अन् मनसेची आघाडी; भाजपचा केला दारूण पराभव

काय म्हटलं आहे आदेशात?

1. महिलांच्या संमतीशिवाय सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत काम करणे बंधनकारक करता येणार नाही.

2. महिलेने यावेळेत काम करण्यास नकार दिल्यावर त्यांना कामावरून काढता येणार नाही.

3. यावेळेत काम करणाऱ्या महिलांच्या प्रवासाची सोय करावी लागेल.

UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
बेळगावसह सीमाभागाबाबत आता शिवसेना देणार टक्कर; एकीकरण समितीबाबत राऊतांचं मोठं विधान

4. यावेळेत काम करणाऱ्या महिलांना अन्नपदार्थ आणि आवश्यक सुविधा पुरवणे आवश्यक.

5. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, चेंजिंग रुमची सुविधा असावी.

6. महिला काम करत असलेल्या ठिकाणी किमान चार महिला असणे आवश्यक आहे.

7. लैंगिक छळ रोखण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in