राहुल गांधींचा प्लॅन पोलीस विमानतळावरच उधळणार!

राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विमानतळावर नियोजन केलं आहे.
राहुल गांधींचा प्लॅन पोलीस विमानतळावरच उधळणार!
Rahul Gandhi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारी दुपारी उत्तर प्रदेशाला जाणार आहेत. घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. पण त्यांना याठिकाणी येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर राहुल गांधी हे तिथे जाण्यावर ठाम आहेत. त्यांचा हा प्लॅन उधळून लखनऊ विमानतळावरून उधळून लावण्याचे नियोजन उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे.

लखीमपूर खीरी येथील घटनेत चार शेतकऱ्यांचा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनांच्या ताफ्याने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघनटांनी केला आहे. या घटनेनंतर रविवारी पहाटे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले आहे.

Rahul Gandhi
मोदी सरकारकडून दणका; घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

प्रियांका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राहुल गांधीही दुपारी लखीमपूर खीरी येथे जाणार आहेत. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेत आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. लखीमपूर खिरी हिंसाचाराचा तपास योग्य दिशेनं होत नाही, या प्रकरणातील मंत्र्यांच्या मुलांवर कारवाई होत नाही. मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, ते ठरवून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत,'' असा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशात 144 कलम का लावले, असा सवाल करत राहुल गांधी म्हणाले, माझ्यासोबत छत्तीसगड व पंजाबचे मुख्यमंत्री लखीमपूर खीरी येथे येणार आहेत. आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केल्यानं लखनऊमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण पोलिसांनी त्यांना लखनऊ विमानतळावरच रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विमानतळावर नियोजन केलं आहे. याविषयी माहिती देताना लखनऊचे पोलिस आयुक्त डी. के. ठाकूर म्हणाले, सरकारने राहुल गांधी यांना परवानगी नाकारली आहे. ते लखनऊमध्ये आल्यास त्यांना विमानतळावर विनंती केली जाईल. लखीमपूर खीरी आणि सीतापूर येथे जाण्यापासून त्यांना रोखले जाईल. लखीमपूर व सीतापूरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी राहुल गांधी यांना थांबवण्याची विनंती आम्हाला केली आहे. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.