Hriday Narayan Dixit
Hriday Narayan Dixitsarkarnama

उत्तरप्रदेशात विधानसभा अध्यक्षांनाही डच्चू ; पुत्रालाही तिकीट नाकारलं

आशुतोष शुक्ला (Ashutosh Shukla) यांना भाजपने भगवंत नगर येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित (Hriday Narayan Dixit) यांचे तिकीट देण्यास नकार दिला आहे. ७५ वर्षीय दीक्षित यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी आता आशुतोष शुक्ला (Ashutosh Shukla) यांना भाजपने भगवंत नगर येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दीक्षित या मतदारसंघातून आपल्या मुलाला तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्नशील होते.

उत्तरप्रदेशाचे न्यायमंत्री ब्रजेश पाठक त्यांना लखनैाच्या छावनी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पाठक हे २०१७ मध्ये लखनौ सेंट्रल मतदार संघातून विजयी झाले होते. त्यामुळे आता छावनी मतदार संघातून विद्यमान खासदार सुरेश तिवारी यांचे तिकीट कापले आहे. लखनौ सेंट्रलमधून रजनीश गुप्ता यांना तिकीट देण्यात आले आहे. पाठक यांना तिकीट दिल्यामुळे अपर्णा यादव यांना येथून तिकीट मिळण्याची शक्यता संपली आहे. या तिकीटावर भापच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी या आपला मुलगा मयांक याला तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्नशील होत्या.

मंत्री स्वाती सिंह या अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आहेत, त्यांचे सरोजिनी नगर येथून तिकीट कापले आहे. या ठिकाणी आता ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेश्वर सिंह यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत लखनैामधील नऊ पैकी आठ जागांवर विजय मिळवला होता. लखनैामध्ये २३ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.

Hriday Narayan Dixit
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना मुस्लिम युवकानं काळं फासलं

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मीडिया सल्लागार शलभमणि त्रिपाठी यांना देवरिया येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना अलाहाबाद पश्चिम येथून तिकिट देण्यात आले आहे. या शिवाय अयोध्येतून वेद प्रकाश गुप्ता, अलाबाबाद दक्षिण येथून नंद कुमार गुप्ता यांना तिकिट देण्यात आले आहे. मंत्री सुरेश पासी यांना जगदीशपूर, सिंधुजा मिश्रा यांना कुंडा येथून उमेदवारी दिली आहे.

मंत्री राजेंद्र प्रताप सिंह मोती यांना पट्टी विधानसभा, मंत्री गोपाल नंदी यांना अलाहाबाद दक्षिण, माजी मंत्री अनुपमा जयसवाल यांना बहराइच आणि मंत्री रमापती शास्त्री यांना मनकापूर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय मंत्री जय प्रताप सिंग यांना बंसी, सतीश द्विदी यांना इटवा, जयप्रकाश निषाद यांना रुद्रपूर, मंत्री सूर्य प्रताप शाही यांना पथरदेवा आणि उपेंद्र तिवारी यांना फेंकना येथून उमेदवारी जाहीर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in