अखिलेश एकटेच लढले; काँग्रेस, बसपाची धुळधाण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवत विरोधकांवर मात केली.
Priyanka Gandhi, Akhilesh Yadav, Mayawati
Priyanka Gandhi, Akhilesh Yadav, MayawatiSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारला खाली खेचण्यासाठी समाजवादी पक्षासह (Samajwadi Party) बसपा व काँग्रेसनंही जोर लावला होता. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवत विरोधकांवर मात केली. मतमोजणीतील आकड्यांकडे नजर टाकल्यास या लढतीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोदींना जोरदार टक्कर दिल्याचे दिसते. तर बसपा आणि काँग्रेसची (Congress) धुळधाण उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) बहुमताचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजप 254 जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पक्षाला 116 उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. काँग्रेस व बसपाचा (BSP) सुफडा साफ झाला असून दोन्ही पक्षांना अनुक्रमे दोन व एका जागेवर आघाडी आहे. अपना दल व राष्ट्रीय लोकदल हे पक्षांनीही बसपा व काँग्रेसला मागे टाकलं आहे. काँग्रेस व बसपाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते.

Priyanka Gandhi, Akhilesh Yadav, Mayawati
भाजपनं इतिहास रचला; योगी मोडणार 37 वर्षांची परंपरा

समाजवादी पक्ष व राष्ट्रीय लोकदलाची आघाडी होती. 2017 च्या निवडणुकीत सपाला केवळ 47 जागा मिळाल्या आहेत. पण या निवडणुकीत अखिलेश यांनी जोरदार टक्कर देत जवळपास 75 अधिक जागांवर आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांनी राज्यात जोरदार वातावरणनिर्मिती केली होती. भाजपकडूनही प्रचारात प्रामुख्याने अखिलेश यांनाच लक्ष्य केलं जात होतं. त्यामुळे खरी लढत भाजप आणि समाजवादी पक्षातच असल्याचे सुरूवातीपासूनचे चित्र होते.

प्रचारात मायावती यांच्यापेक्षा प्रियांका यांनी अधिक जोर लावला होता. बसपा मात्र या निवडणुकीत कुठेच दिसून आला नाही. माजी मुख्यमंत्री व पक्षाच्या प्रमुख मायावती यांची उत्तर प्रदेशातील ताकद आता नावापुरतीच उरल्याचे दिसते. प्रचारातही मायावती फारशा सक्रीय नसल्याचेच चित्र होते. सध्यातरी या पक्षाला केवळ एकाच जागेवर आघाडी आहे. ही जागाही त्या राखणार की नाही, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. मागील निवडणुकीत बसपाला 19 जागा मिळाल्या होत्या.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यात जोर लावला होता. महिलांसह तरूणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या. महिलांना 40 टक्के उमेदवारी दिली. पण त्याचा फारसा प्रभाव मतदारांना पडल्याचे दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसचे सात उमेदवार निवडून आले होते. सध्याच्या मतमोजणीतील स्थितीवरून काँग्रेसला केवळ दोन जागांवर आघाडी आहे. प्रियांका यांनी उत्तर प्रदेशसाठी खूप मेहनत घेतली. पण मतदारांनी त्यांना सपशेल नाकारलं आहे.

Priyanka Gandhi, Akhilesh Yadav, Mayawati
मोन्सेरात यांचं मोठं वक्तव्य; भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला

सध्याची आघाडी -

भाजप - 251

अपना दल - 11

सुहेलदेव भारतीय समाज पार्टी - 5

समाजवादी पक्ष - 116

बसपा - 1

काँग्रेस - 2

राष्ट्रीय लोकदल - 9

इतर - 8

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com