Keshav Prasad Maurya
Keshav Prasad MauryaSarkarnama

उपमुख्यमंत्री भडकले; माईक फेकून देत पत्रकाराचा मास्क ओढला अन् व्हिडीओच केला डिलीट

धर्मसंसदेच्या मुद्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर केशव प्रसाद मौर्य यांनी नाराजी व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये झालेल्या धर्म संसदेतील (Dharma Sansad) प्रक्षोभक भाषणांचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) त्याची दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्येही (UP Assembly Election) या मुद्दयावर राजकारण (Politics) तापण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांना यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते चांगलेच भडकले. त्यांनी थेट माईक फेकला आणि पत्रकाराचा मास्क ओढत संपूर्ण मुलाखतच सुरक्षारक्षकांना डिलीट करायला लावली.

बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad) यांना हरिद्वार आणि रायपुर येथे झालेल्या धर्मसंसदेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. सुमारे दहा मिनिटे या प्रश्नावर बोलल्यानंतर मौर्य यांनी निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारा अशी विनंती केली. त्यावर हे प्रश्न निवडणुकीसंदर्भातच आहेत, असे सांगताच मौर्य भडकले. तुम्ही पत्रकार नाही तर एजंट म्हणून बोलत आहात, असं ते मुलाखत घेणाऱ्या प्रतिनिधीला म्हणाल्याचे बीबीसीने म्हटलं आहे.

Keshav Prasad Maurya
वाद पेटला! आव्हाड भडकले अन् थेट आमदार महेश शिंदेंची लाज काढली

यावरच न थांबता मौर्य यांनी थेट मुलाखतीसाठी जॅकेटला लावलेला माईक काढला. मुलाखत तिथंच थांबवत कॅमेराही बंद करायला सांगितले. त्यांनतर प्रतिनिधीच्या चेहऱ्यावरील मास्क ओढला. सुरक्षारक्षकांना बोलावून मुलाखतीचा कॅमेरातील व्हिडीओ डिलिट करायला लावला. पण त्यानंतरही चीपमधून हा व्हिडीओ रिकव्हर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

का भडकले मौर्य?

धर्मसंसदेतील भाषणांवर मुख्यमंत्री मौन बाळगतात. त्यामुळे प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांना खतपाणी मिळत असल्याबाबत मौर्य यांना विचारण्यात आले होते. त्यावर मौर्य म्हणाले, भाजपला प्रमाणपत्राची गरज नाही. धर्माचार्यांना मंचावरून त्यांचं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकारी आहे. तुम्ही फक्त हिंदू धर्माचार्यांवरच का बोलता? इतर धर्मातील धर्मगुरूंबद्दल का बोलत नाही? धर्मसंसद भाजपची नसून संतांची आहे.' याच मुद्यावर सुमारे दहा मिनिटे बोलल्यानंतरही प्रश्न थांबत नसल्याने मौर्य भडकले.

काय घडलं होतं धर्मसंसदेत?

धर्मसंसदेत अनेकांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. विशिष्ट धर्माविषयी भाषणांमध्ये गरळ ओकण्यात आली होती. महाराष्ट्रातील कालीचरण महाराजांनी महात्मा गांधीविषयी अपशब्द काढले होते. त्यावरून त्यांना अटकही झाली. तसेच इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही गेला असून त्यावर सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com