भाजपची जोरदार मुसंडी; आझम खान यांच्या रामपूरवर कब्जा, आझमगडमध्येही आघाडी

आझम खान आणि अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यामुळे झाली निवडणूक.
UP Bypoll Results Update
UP Bypoll Results UpdateSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाचे नेते व आमदार आझम खान यांचा गड मानल्या जाणाऱ्या रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर आझमगड या सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या गडातही भाजपने आघाडी घेतली आहे. याठिकाणीही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. (UP Loksabha Bypoll Results Latest News)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली मार्च महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अखिलेश (Akhilesh Yadav) आणि आझम खान यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर प्रत्येक फेरीत दोन्ही पक्षांचे उमेदवार मागेपुढे होते. त्यामुळे अत्यंत अटीतटीची या लढती झाल्या.

UP Bypoll Results Update
भगवंत मान यांना मोठा झटका; लोकसभेच्या पोटनिवडणुकीत गडाला सुरूंग

रामपूरमध्ये सुरूवातीला आझम खान यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती. पण नंतर मोहम्मद आसिम रझा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात भाजपने घनश्याम लोधी यांना तिकीट दिले होते. या चुरशीच्या लढतीत लोधी यांनी रझा यांचा 42 हजार 192 मतांनी पराभव केला आहे.

लोधी हे काही वर्षांपूर्वी आझम खान यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जात होते. पण जानेवारी महिन्यात ते भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर आझम कान यांच्या राजीनाम्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांनाच मैदानात उतरवले. भाजपच्या या खेळीने विरोधकांना गारद गेले. मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मिळवलेला हा पहिला मोठा विजय आहे.

UP Bypoll Results Update
पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा दणदणीत विजय; भाजपला चारपैकी तीन जागा

पंजाबमध्ये 'आप'ला धक्का

काही महिन्यांपूर्वीच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून पंजाबमध्ये सत्ता काबीज केलेल्या आम आदमी पक्षाला राज्यात पहिला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याच पूर्वीच्या मतदारसंघात हा पराभव पत्करावा लागल्याने मान यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

भगवंत मान हे विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे संगरूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत शिलोमणी अकाली दल (अमृतसर) पक्षाचे अध्यक्ष सिमरनजित सिंग मान या 77 वर्षीय नेत्यानं आपच्या उमेदवाराला धूळ चारली आहे. आपणे गुलमेल सिंग यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा 5 हजार 800 मतांनी पराभव झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com