वाजपेयींचा पराभव करणाऱ्या राजाचं नाव भाजपकडून विद्यापीठाला

हे विद्यापीठ सुमारे शंभर एकर जागेत उभारले जाणार आहे.
University named after Jat king who defeated Atal Bihari Vajpayee
University named after Jat king who defeated Atal Bihari Vajpayee

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही दौरे वाढणार आहे. मोदी यांचा दौरा पुढील आठवड्यात असून याच दौऱ्यात एका विद्यापीठाचे भूमिपुजन केलं जाणार आहे. याच विद्यापीठाला राजा महेंद्र प्रताप सिंग यांच नाव देण्याचं प्रस्तावित आहे. (University named after Jat king who defeated Atal Bihari Vajpayee)

उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये हे विद्यापीठ सुमारे शंभर एकर जागेत उभारले जाणार आहे. राजा महेंद्र प्रताप सिंग (Raja Mahendra Pratap Singh) यांनी 1957 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा पराभव केला होता. मथुरा मतदारसंघात दोघे आमनेसामने होते. वाजपेयी हे जनसंघाचे उमेदवार होते. सिंग यांनी ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. 

राजा महेंद्र प्रताप सिंग हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा जन्म एक सप्टेंबर 1886 रोजी हाथरसमध्ये झाला होता. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी ते आघाडीवर होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत घालवले. तसेच त्यांनी आपली खूप संपत्तीही दान केली होती. अलीगड विद्यापीठालाही त्यांनीच जमीन दिली होती. त्यांचं योगदान लक्षात घेऊन अलीगडमध्ये उभारण्यात येणाऱ्या राजकीय विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं जाणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. 

पंतप्रधान 14 सप्टेंबर रोजी अलीगडमध्ये येत आहेत. विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळं त्यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. सध्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर ठिकठिकाणी महापंचायत घेण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चानं केली आहे. या आंदोलनात उत्तर प्रदेशात बहुतेक जाट लोक सहभागी झाले आहे.

राजा महेंद्र प्रताप सिंह हे जाट होते. त्यामुळं त्यांचं नाव विद्यापीठाला देऊन जाटांना आपलसं करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तसेच जाट राज्याच्या नावानं उत्तर प्रदेशात फारसा महत्व दिलं गेलेलं नाही, त्यामुळे विद्यापीठाला नाव देत त्यांचा सन्मान केला जाणार असल्याची भूमिका भाजप नेत्यांकडून मांडली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com