राहुल गांधींच्या पब पार्टीवरून वाद सुरू असतानाच स्मृती इराणी पोहचल्या वायनाडमध्ये

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नाईटक्लबमधील व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे.
राहुल गांधींच्या पब पार्टीवरून वाद सुरू असतानाच स्मृती इराणी पोहचल्या वायनाडमध्ये
Smriti Irani, Rahul GandhiSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नाईटक्लबमधील व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. तर काँग्रेसनंही भाजपवर (BJP) पलटवार केला आहे. एकीकडे हा वाद सुरू असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये (Waynad) पोहचल्या आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला आहे. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही इराणींनी राहुल गांधींना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही उभे राहिले होते. तिथे त्यांचा विजय झाला. याच मतदारसंघात स्मृती इराणी दाखल झाल्या आहेत. राहुल गांधींच्या नाईटक्लबमधील व्हिडीओ व्हायरल झाला त्याच दिवशी त्या वायनाडमध्ये पोहचल्या आहेत.

Smriti Irani, Rahul Gandhi
मी त्याला चालायला शिकवलं अन् तो मला तुडवत निघून गेला! शिवपाल यादवांच्या ट्विटनं खळबळ

इराणी या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री आहेत. या विभागाच्या विविध कार्यक्रमांतर्गत त्या मंगळवारी वायनाडच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांना भेटी दिल्या. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहितीही घेतली. पण या दौऱ्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. हा भाजपच्या रणनीतीचा भाग असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांचा नेपाळमधील एका नाईटक्लबमधील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते राहुल गांधींसह काँग्रेसवर तुटून पडले आहेत. त्यानंतर काँग्रेसनंही पलटवार करत लग्नाला जाणं अजून तरी गुन्हा नाही, अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पाकिस्तान भेटीवरूनही काँग्रेसने निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi Pub Video Viral)

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, निमंत्रण नसताना पंतप्रधान मोदी हे नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. त्याप्रमाणे राहुल गांधी गेलेले नाहीत. पठाणकोटमध्ये काय झालं, हे आपण पाहिलं आहे. राहुल गांधी हे मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये एका पत्रकाराच्या विवाहात सहभागी होण्यासाठी गेले आहेत.

Smriti Irani, Rahul Gandhi
राहुल गांधींचा पबमधील व्हिडीओ तुफान व्हायरल; मैत्रिणीच्या विवाहासाठी नेपाळमध्ये

विवाह हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हा गुन्हा नाही. पण पंतप्रधान आणि भाजपला लवकरच मित्रांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या विवाहात सहभागी होणे म्हणजे गुन्हा असा निर्णय घेतील, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला. पंतप्रधान मोदी हे 2015 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले होते. हे उदाहरण देत सुरजेवाला यांनी राहुल गांधींची पाठराखण केली.

दरम्यान, राहुल गांधी हे सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एका मैत्रिणीच्या विवाहासाठी ते तिथं गेले आहेत. यादरम्यानचा त्यांना एक व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडू येथील एका नाईटक्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल करत भाजपने काँग्रेस व राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.