स्मृती इराणी बनल्या लेखिका अन् कादंबरीचं नाव 'लाल सलाम'!

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आता लेखिका बनल्या असून, त्यांनी कादंबरी लिहिली आहे.
Smriti Irani
Smriti IraniSarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या आधी लोकप्रिय अभिनेत्री होत्या. राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी चांगलीच छाप पाडली आहे. आता इराणी या लेखिका बनल्या असून, त्यांनी कादंबरी लिहिली आहे. तिचे नाव लाल सलाम (Lal Salaam) असून, त्यांनीच याची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.

स्मृती इराणी यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर एप्रिल 2010 मध्ये झालेल्या हल्ल्यावर ही कादंबरी लिहिली आहे. छत्तीसगडमध्ये दांतेवाडा येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान ठार झाले होते. देशासाठी बलिदान देणारे पुरूष आणि स्त्रीयांना त्यांनी या कांदबरीच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. देशातील नक्षलग्रस्त भागातील आव्हानांचा उहापोहसुद्धा या कादंबरीतून करण्यात आला आहे. ही कादंबरी 29 नोव्हेंबरला बाजारात उपलब्ध होणार आहे.

Smriti Irani
आधी तुम्ही कुठंय ते सांगा; सर्वोच्च न्यायालयाचा परमबीरसिंहांना दणका

विक्रम प्रताप सिंह या तरुण अधिकाऱ्याची कथा इराणी यांनी मांडली आहे. त्याला व्यवस्थेकडून मिळणारी आव्हाने, राजकारण आणि भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याबद्दल बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, अनेक वर्षे ही कथा माझ्या मनात रेंगाळत होती. अखेर ती कागदावर उतरवण्याची भावना मला टाळता आली नाही. वाचक नक्कीच याचा आनंद घेतील. भारतातील फारसा चर्चेत नसलेला भाग मी मांडण्याच प्रयत्न केला आहे.

Smriti Irani
'ईडी'च्या प्रमुखांवर मोदी सरकार मेहरबान! अध्यादेश काढून दोनच दिवसांत मुदतवाढ

स्मृती इराणी यांच्याकडे मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाचे असे महिला व बाल कल्याण खाते देण्यात आले होते. नंतर अतिशय महत्वाच्या राजकीय कामकाजविषयक मंत्रिगटात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना स्थान देण्यात आले. या समितीचे अध्यक्षपद खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आहे. इराणी यांच्याकडे आधी वस्त्रोद्योग खाते देऊन त्यांना अडगळीत टाकण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाल्याने इराणींचे सरकारमधील वजन पुन्हा एकदा वाढल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com