भाजपला मोठा धक्का! केंद्रीय मंत्र्याची अधिकृत ग्रुपमधून एक्झिट

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thakur) यांनी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे.
भाजपला मोठा धक्का! केंद्रीय मंत्र्याची अधिकृत ग्रुपमधून एक्झिट

Shantanu Thakur and Narendra Modi 

Sarkaranama

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thakur) यांनी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. मी आता काही बोलणार नाही, योग्य वेळी कृती करेन, असा सूचक इशारा ठाकूर यांनी दिला आहे. मागील महिन्यांत पक्षाच्या काही आमदारांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली होती. त्यांना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत डावलल्याने ते नाराज आहेत.

पश्चिम बंगाल भाजपचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप ठाकूर यांनी सोडला आहे. यामुळे राज्य तसेच, केंद्रीय पातळीवर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा ग्रुप अनावश्यक झाला होता, त्यामुळे मी तो सोडला, अशी भूमिका ठाकूर यांनी घेतली आहे. ठाकूर मटुआ समाजातील प्रभावशाली नेते आहेत.ऑल इंडिया मटुआ महासंघाशी ते निगडित आहेत. त्यांनी आधी अनेक वेळा नागरिकत्व दुरुसीत कायद्याच्या अंमबजाबवणीला होत असलेल्या विलंबाबद्दल सरकारचे कान टोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ठाकूर यांना मंत्रिपद मिळाले होते. ठाकूर हे बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपला गळती लागली आहे. भाजपचे (BJP) आणखी काही आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. ते लवकरच भाजपला रामराम करुन तृणमूलमध्ये दाखल होणार आहेत. हे आमदार भाजपमध्ये नाराज असून, ते पक्षाच्या आमदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून डिसेंबर महिन्यात बाहेर पडले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी या आमदारांचा लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश होईल, असा गौप्यस्फोट त्यावेळी केला होता.

मुकुटमणी अधिकारी (राणाघाट दक्षिण), सुब्रत ठाकूर (गजघाट), अंबिका रॉय (कल्याणी), अशोक किर्तनिया (बोंगाव उत्तर) आणि असीम सरकार (हरीणघाट) या पाच आमदारांचा यात समावेश आहे. भाजप नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी पक्षाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला होता. त्यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात न आल्याने ते नाराज होते.

<div class="paragraphs"><p>Shantanu Thakur and Narendra Modi&nbsp;</p></div>
राज्यावर कोरोनाचे सावट पण सोमय्यांना सतावतेय वेगळीच भीती

बाबुल सुप्रियो यांनी नुकताच भाजपला धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिळालेली खासदारकीही सोडली आहे. सुप्रियो यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. त्यांनी भाजप सोडल्यानंतर महिनाभराने राजीनामा दिला होता.

<div class="paragraphs"><p>Shantanu Thakur and Narendra Modi&nbsp;</p></div>
मुख्यमंत्र्यांनी एकाच फटक्यात पेट्रोल 25 रुपयांनी कमी केलं पण मेख मारून ठेवली!

सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश झाला होता. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in