श्रीपाद नाईकांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी राजनाथसिंह थेट पोचले गोव्यात

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला काल कर्नाटकात भीषण अपघात झाला होता. त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
union minister rajnath singh visits sripad naik at goa hospital
union minister rajnath singh visits sripad naik at goa hospital

बंगळूर : केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला काल कर्नाटकातील अंकोला नजीक भीषण अपघात झाला होता. नाईक यांना उपचारासाठी गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज दुपारी थेट रुग्णालयात पोचले. 

नाईक यांना काल रात्री गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजनाथसिंह हे गोव्यात आले आहेत. आयएनएस हंसा तळावर विशेष विमानाने त्यांचे आगमन झाले. त्यानंतर ते थेट नाईक हे दाखल असलेल्या रुग्णालयात पोचले. 

राजनाथसिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशीही आज चर्चा केली. नाईक यांची प्रकृती आधी चिंताजनक होती मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याचबरोबर आणखी एक वैद्यकीय पथकही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. 

श्रीपाद नाईक हे मोटारीने यालपुराहून गोकर्णला जात असताना त्यांच्या मोटारीला काल अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करीत असलेल्या पत्नी विजया नाईक या ठार झाल्या होत्या. नाईक यांचा स्वीय सहायकही अपघातात ठार झाला आहे. अंकोला तालुक्यात हा अपघात घडला असून, हा तालुका हा उत्तर कन्नड जिल्ह्यात आहे. होसकांबी घाटात नाईक यांच्या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. 

या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. नाईक यांना गोव्यात योग्य उपचार मिळतील याची काळजी घेण्याची सूचना मोदींनी केली होती. नाईक हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार आहे. याचबरोबर ते संरक्षण राज्यमंत्रीही आहेत. नाईक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com