पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त! मोदींच्या मंत्र्यांनी मांडलं गणित

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त! मोदींच्या मंत्र्यांनी  मांडलं गणित
Rameshwar Teli

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील सलग सात दिवस दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. यामुळे देशात इंधन दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. असे असताना मोदी सरकारमधील मंत्र्याने अजब दावा केला आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनीच हा दावा केला आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना पेट्रोल, डिझेल दरवाढीवर भाष्य केले. त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना पाण्याच्या बाटलीशी केली. ते म्हणाले की, मिनरल वॉटरची किंमत पेट्रोल, डिझेलपेक्षा जास्त आहे. पेट्रोलची किंमत 40 रुपये आहे. यावर राज्य सरकारे त्यांचा कर लावतात. त्यावर पेट्रोलियम मंत्रायल 30 रुपये आकारते. यामुळे पेट्रोलची किंमत 100 रुपयांपर्यंत पोचते. याचवेळी तुम्ही हिमालयातील पाणी पिता त्याच्या एका बाटलीची किंमत 100 रुपये आहे.

भाजप नेत्यांनी इंधन दरवाढीवरून तारे तोडल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी इंधन दरवाढीचे खापर काँग्रेस सरकावर फोडले होते. तर भाजपचे नेता व बिहारचे पर्यटनमंत्री नारायण प्रसाद यांनी जनतेला महागाईची सवय झाली आहे, असा अजब दावा केला होता. वाढत्या महागाईमुळे नेत्यांना त्रास होत असून, जनतेला काही फरक पडत नाही, असा दावा त्यांनी केला होता.

Rameshwar Teli
लोकांना फुकट कोरोना लस दिल्यानेच पेट्रोल महागले; पेट्रोलियम मंत्र्यांचा जावईशोध

देशभरात काल (ता.11) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैसे वाढ करण्यात आली. सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर पोचली आहे.

Rameshwar Teli
पडद्यामागं काय घडलं : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला कशी झाली अटक?

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 104.44 रुपये तर मुंबईत 110.41 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 93.17 रुपये आणि मुंबईत 101.03 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in