आता कारमधील सगळ्यांसाठी 'सीट बेल्ट' बंधनकारक! गडकरींची मोठी घोषणा

देशातील वाहन उद्योगामध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचा चंग नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बांधला आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama

नवी दिल्ली : देशातील वाहन उद्योगामध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचा चंग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बांधला आहे. आज त्यांनी वाहन उद्योगाबाबत मोठी घोषणा केली आहे. कारमधील (Car) सर्व प्रवाशांसाठी आता थ्री पॉईंट सीटबेल्ट (Three Point Seat Belt) बंधनकारक असणार आहे. यामुळे कंपन्यांना आता कारचे उत्पादन करतानाच ही तरतूद करावी लागेल. प्रवाशांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून गडकरींनी हा निर्णय घेतला आहे.

गडकरींनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कारमध्ये मागील सीटवरील प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीटबेल्टची व्यवस्था नसते. यामुळे कार उत्पादक कंपन्यांना कारमध्ये थ्री पॉइंट सीटबेल्ट द्यावा लागेल. हा सीटबेल्ट कारच्या मागील सीटवर मध्यभागी बसलेल्या प्रवाशासाठीही द्यावा लागेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याची माहिती गडकरींनी दिलेली नाही. सध्या बहुतांश कारच्या पुढील सीट आणि मागील दोन सीटला थ्री पॉइंट सीटबेल्ट असतात. याचवेळी मागील सीटवर मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला थ्री पॉइंट सीटबेल्ट नसतो.

Nitin Gadkari
यापुढे हे चालणार नाही! राणे सुटताच वैभव नाईकांचा थेट इशारा

कारमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक

गडकरींनी नुकताच कारला सहा एअरबॅग (Airbags) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने आधी कारला दोन एअरबॅग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. तो याच वर्षी 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. यामुळे देशात विक्री होणाऱ्या स्वस्तात स्वस्त नवीन कारलाही दोन एअरबॅग असणे बंधनकारक आहे. नंतर गडकरींनी ट्विटरवरून कारला सहा एअरबॅग बंधनकारक करण्याची घोषणा केली होती. गडकरींनी ट्विटरवर म्हटले होते की, कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आठपर्यंत प्रवासी क्षमता असलेल्या कारला किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक आहे. याबाबतच्या मसुद्याला सरकारने मंजुरी दिली आहे.

Nitin Gadkari
वाझे माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही! देशमुखांच्या वकिलांनी सांगितलं कारण...

जुनी वाहने भंगारात

गडकरींनी जुनी वाहने भंगारात काढणाऱ्या (Vehicle Scrapping Policy) वाहनमालकांसाठी नुकतीच मोठी घोषणा केली होती. गडकरी म्हणाले होते की, जुनी वाहने भंगारात काढल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन वाढेल. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणांतर्गत वाहनमालकांना अधिकाधिक कर सवलती देण्याबाबत माझी अर्थ मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. या धोरणांतर्गत जास्त सवलती द्याव्यात, अशी विनंती मी जीएसटी परिषदेला करणार आहे. सध्या जुनी वाहने भंगारात काढून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना राज्ये पथ करावर 25 टक्के परतावा देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com