पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला जनता वैतागलीय! गडकरींचा केंद्र सरकारला घरचा आहेर

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे.
union minister nitin gadkari says people agitated by rising fuel prices
union minister nitin gadkari says people agitated by rising fuel prices

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढीवरुन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज केंद्रातील भाजप (BJP) सरकारला घरचा आहेर दिला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे जनता वैतागली आहे, अशी कबुली त्यांनी दिली आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अर्ध्या देशात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोचला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला. इंधन दरवाढीमुळे जनतेत असलेल्या असंतोषाची दखलही त्यांनी घेतली. ते  म्हणाले की, पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. यामुळे जनता वैतागली आहे. खासगी वाहनमालक आणि वाहतूकदारांना हे दर परवडेनासे झाले आहेत. 

इंधन दरवाढीवर लिक्विफाईड नॅचरल गॅस (LNG) हा उत्तम पर्याय आहे. एलएनजीमुळे इंधन खर्चात दरवर्षी प्रतिवाहन ११ लाख रुपयांची बचत होणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलने सुरू आहेत. परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे प्रदूषणमुक्त एलएनजी  भविष्यातील इंधन ठरणार असून त्यामुळे परिवहन क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. 

गडकरी यांच्या डिझेलमुक्त विदर्भ संकल्पनेंतर्गत बैद्यनाथ समूहातर्फे आउटर रिंग रोडवरील पांढूर्णा शिवारात देशातील पहिल्या बी-एलएनजी स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, खनिज तेलाच्या आयातीवर दरवर्षी ८ लाख कोटींचे परकी चलन खर्च होते. शिवाय पेट्रोल व डिझेलमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही होते. शेतातील बायोमासपासूनही इथेनॉल निर्मिती संदर्भात ३ महिन्यांमध्ये निर्णय घेतला जाईल. बायो इथेनॉलमुळे कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. पुढच्या टप्प्यात बायो एलएनजी निर्मितीसह ग्रीन हायड्रोजनवर वाहने चालविण्याचा प्रयत्न आहे.
  
हेही वाचा : नव्या मंत्रिमंडळातील एकावर खुनाचा, चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचे तर सात जणांवर दंगलीचे गुन्हे 

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com