गडकरींची आजची संसदेतील एन्ट्री ठरली अनोखी अन् सगळ्यांचं लक्ष वेधलं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सातत्याने हायड्रोजन हे भविष्याचे इंधन असल्याचे सांगितले जात आहे.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin GadkariSarkarnama

नवी दिल्ली : मागील आठवडाभरापासून देशभरात इंधनाचे दर (Fuel Price Hike) सातत्याने वाढत असल्याने नागरिक हैरान झाले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून सातत्याने हायड्रोजन (Hydrogen Fuel) हे भविष्याचे इंधन असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी नुकतेच देशातील पहिल्या हायड्रोजनवर धावणाऱ्या कारचे लॉन्चिंगही केले आहे. त्यानंतर बुधवारी गडकरी यांनी याच कारमधून थेट संसेदत (Parliament) आले. त्यामुळे या अनोख्या कारनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.

भारतात (India) पहिल्यांदाच हायड्रोजन कार रस्त्यावर धावण्यास सज्ज झाल्या आहेत. गडकरी यांनी नुकतेच 'मिराई' (Mirai) या कारचे उद्घाटन केले होते. सध्या देशात इंधन दरवाढीनं (Fuel prices) कहर केला आहे. त्यावर उपाय म्हणून गडकरींन याआधीच ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) या नव्या इंधनाचा पर्याय सुचवला आहे. इलेक्ट्रिकप्रमाणेच हायड्रोनवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) भविष्यात प्राधान्य देण्याचे सुतोवाच गडकरी यांनी यापूर्वी अनेकदा केले आहे.

Union Minister Nitin Gadkari
वाहनचालकांना दणका! पेट्रोल, डिझेल 9 दिवसांत 8 वेळा महागलं

गडकरी केवळ घोषणा करून थांबले नाहीत तर ते बुधवारी स्वत: या कारमध्ये बसून घरापासून संसदेत दाखल झाले. त्यामुळे ते संसदेत पोहचताच सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून या कारची चाचपणी केली जात आहे. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, आत्मनिर्भर बनण्यासाठी आपण ग्रीन हायड्रोजन या इंधनाचा वापर सुरू केला आहे. हे इंधनाची निर्मिती पाण्यापासून होते.

आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल. त्यामुळे इंधनाची आयात कमी होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असं गडकरी यांनी सांगितलं. हायड्रोजनचा जागतिक निर्यातदार बनण्यासाठीच्या केंद्राच्या तीन हजार कोटी रुपये मिशनचा उल्लेख करताना गडकरी यांनी म्हटलं की, देशात जिथे कोळशाचा वापर केला जात आहे, तिथे ग्रीन हायड्रोजनचा वापर केला जाईल.

या महिन्याच्या सुरूवातीला संसदेत बोलताना गडकरी म्हणाले होते की, पुढील दोन वर्षांत पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर, कार आणि रिक्षांच्या किंमतीएवढी किंमत इलेक्ट्रिक कार, स्कूटर, रिक्षाचीही असेल. लिथियम आयन बॅटरीच्या किंमती कमी होतील. पेट्रोलवर तुम्ही शंभर रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक कारवर 10 रुपयेच खर्च येईल, असं लोकसभेत बोलतान गडकरी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com