Nitin Gadkari Threat News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट

Nitin Gadkari Receives Threat Call : नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन
Nitin Gadkari News
Nitin Gadkari NewsSarkarnama

Delhi News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नितीन गडकरी यांना सोमवारी (दि.15 मे) संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nitin Gadkari News
Shinde Vs Pawar: जामखेड बाजार समितीत दैव राम शिंदेंच्या बाजूने; ईश्‍वर चिठ्ठीतून सभापती भाजपचा तर उपसभापती राष्ट्रवादीचा

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात सोमवारी संध्याकाळी एक फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपल्याला केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं आहे, असं सांगून धमकी दिली. या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी देखील दोनवेळा नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. त्या प्रकरणाचा देखील तपास सुरू असून आता पुन्हा तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्यामुळे पोलीस अलर्ट झाले आहेत.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com