लोकांचा विश्वास बसावा म्हणून गडकरींनी थेट कारच घेतली विकत!

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे इलेक्ट्रिकसह पर्यायी हरित इंधनावर चालणाऱ्या वाहनांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे.
लोकांचा विश्वास बसावा म्हणून गडकरींनी थेट कारच घेतली विकत!
Nitin GadkariSarkarnama

नवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे इलेक्ट्रिकसह पर्यायी हरित इंधनावर चालणाऱ्या वाहनांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. जनतेत याबाबत जागृती व्हावी, यासाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आता एक पाऊल पुढे टाकले आहे. सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार झालेल्या हरित हायड्रोजनवर चालणारी कारच त्यांनी थेट खरेदी केली आहे.

मागील काही दिवसांपासून हरित इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणारी भूमिका गडकरींनी घेतली आहे. याबाबत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, टाकाऊतून मूल्यवान गोष्टी मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. वेगवेगळ्या शहरात हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या बस, ट्रक आणि कार चालवण्याची आपली योजना आहे. शहरातील कचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून तयार केलेला हरित हायड्रोजन यासाठी वापरण्यात येईल.

सांडपाण्यातून मिळवलेल्या हायड्रोजनवर वाहन चालवता येते, यावर लोकांचा विश्वास बसावा, असा माझा प्रयत्न आहे. यामुळे या पथदर्शी प्रकल्पातील एक कार मी विकत ङेतली आहे. ही कार हरित हायड्रोजनवर चालते. हा हरित हायड्रोजन फरिदाबादमधील ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेला आहे. लोकांचा यावर विश्वास बसावा यासाठी ही कार मी आता शहरात फिरवणार आहे.

Nitin Gadkari
परमबीरसिंहांच्या निलंबनावरून मानापमान नाट्य! आदेश स्वीकारण्यास थेट नकार

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे ती खरेदी करणे नागरिकांना परवडत नाही. यावर नुकतेच गडकरी म्हणाले होते की, भारत आता इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीजवळ पोचला आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत पेट्रोल वाहनांच्या किमतीपर्यंत घट होईल. सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ ५ टक्के जीएसटी लावला जात आहे. लिथियम आयन बॅटरींची किंमतही आता कमी होऊ लागली आहे. सर्व पेट्रोल पंपांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसावावीत यासाठी सरकारने आधीच धोरणही आखले आहे. पुढील दोन वर्षांत देशात चार्जिंग पॉईंट मोठ्या प्रमाणात वाढतील.

Nitin Gadkari
आता पाकिस्तानमधील उद्योगांवर बंदी घालू का? सरन्यायाधीशांना सरकारला फटकारलं

इलेक्ट्रिक वाहनांना देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी कोणत्याही कृत्रिम प्रोत्साहनाची गरज नाही. पेट्रोलवरील वाहन चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटर 10 रुपये खर्च होतो तर डिझेलसाठी प्रतिकिलोमीटर ७ रुपये खर्च होतो. इलेक्ट्रिक वाहनांबात हा खर्च केवळ 1 रुपया प्रतिकिलोमीटर आहे, असेही गडकरींनी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in