कुत्र्याला फिरवणं महागात! आयएस अधिकाऱ्याची लडाखला तर पत्नीची अरुणाचलला बदली

केंद्रीय गृह मंत्रालयानं दाखवला हिसका
कुत्र्याला फिरवणं महागात! आयएस अधिकाऱ्याची लडाखला तर पत्नीची अरुणाचलला बदली
IAS Sanjeev KhirwarSarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर (Thyagraj Stadium) खेळाडू व प्रशिक्षकांना सराव अर्ध्यावरच सोडून सायंकाळी सात वाजताच बाहेर जा, असा दबाव आणला जात होता. कारण त्याच वेळी आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारचे वरिष्ठ सचिव संजीव खिरवार आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी त्यागराज स्टेडियमवर येत होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता खिरवार यांची तडकाफडकी लडाखला तर त्यांच्या पत्नीची अरुणाचल प्रदेशला बदली करण्यात आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली आहे. गृह मंत्रालयाने खिरवार यांची तातडीनं लडाखलला बदली करण्यात आली आहे. खिरवार हे 1994 च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. अधिकारी असलेल्या त्यांच्या पत्नीची अरुणाचल प्रदेशला बदली करण्यात आली आहे. ही बदली तातडीने लागू करण्यात आली आहे. याचबरोबर दिल्लीच्या मुख्य सचिवांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

IAS Sanjeev Khirwar
भाजपशासित मध्य प्रदेशात दारु स्वस्त! करात कपातीचा मोठा निर्णय

खिरवार प्रकरणानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील सर्व सरकारी स्टेडियम रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, उन्हाळा आणि स्टेडियम सायंकाळी 6 अथवा 7 वाजता बंद होत असल्याने खेळाडूंना अडचणी येत आहेत. ही बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. आता सरकारने सर्व स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे खेळाडूंना त्यांचा वापर करता येईल.

IAS Sanjeev Khirwar
मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करावं लागणार! लोकसभा सचिवालयाची नोटीस

कुत्र्याला फिरविण्यासाठी त्यागराज स्टेडिअमवर जातो हे खिरवार यांनी कबूल केले होते. मात्र आपण कोणाला बाहेर जाण्याची सक्ती केली नसल्याचीही सारवासारव केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आधीच जाहीर केले होते. रात्री १० पर्यंत सर्व स्टेडिअम खेळाडू-प्रशिक्षकांसाठी खुली राहतील, या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होईल, असेही सिसोदियांनी स्पष्ट केले होते. दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनीही खिरवार यांच्या सर्व उद्योगांची चौकशी करण्याची मागणी नायब राज्यपालांकडे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in