माजी मुख्यमंत्र्यांनी पद्म नाकारताच केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा खुलासा

मोदी सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू आहे.
Buddhadeb Bhattacharjee refuses Padma Bhushan
Buddhadeb Bhattacharjee refuses Padma BhushanSarkarnama

नवी दिल्ली : मोदी सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला असून, काहींना तो मिळाल्यावरून गदारोळ सुरू आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांनी पद्मभूषण नाकारला आहे. आता यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. (Buddhadeb Bhattacharjee refuses Padma Bhushan)

प्रजसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल (ता.25) केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री भट्टाचार्य यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला होता. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते सातत्याने टीका करीत असतात. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर लगेचच भट्टाचार्य यांनी हा पुरस्कार नाकारल्याचे जाहीर केले होते. त्यांनी म्हटले होते की, मला पद्मभूषण मिळणार असल्याचे आधी काहीही माहिती नव्हते. मला कुणीही काहीही सांगितले नव्हते. तरीही मला पद्मभूषण त्यांनी दिला असेल तर तो मी नाकारत आहे.

Buddhadeb Bhattacharjee refuses Padma Bhushan
पंडित चटर्जींनी पद्म नाकारला अन् म्हणाले, या वयात हा पुरस्कार शोभत नाही!

भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारल्यानंतर सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या . प्रजासत्ताक दिनीच सरकार तोंडावर पडल्याचे चित्र निर्माण झाले. कारण पद्म पुरस्कार जाहीर करण्याआधी संबधित व्यक्तीची संमती बंधनकारक आहे. अखेर भट्टाचार्य यांची संमती घेण्यात आली होती का? याचा शोध घेण्यात आला. यावर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने खुलासा केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही भट्टाचार्य यांच्या घरी फोन केला होता. तो फोन त्यांच्या पत्नीने उचलला. पद्म पुरस्काराचे सांगताच त्यांच्या पत्नीने आमचे आभार मानले होते.

Buddhadeb Bhattacharjee refuses Padma Bhushan
मोदी सरकार तोंडघशी; तिघांनी पद्म सन्मान नाकारला!

दरम्यान, भट्टाचार्य यांच्यासह तीन जणांनी यावर्षी पद्म सन्मान नाकारला आहे. यात पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंद्य चटर्जी (Anindya Chatterjee) आणि ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार नाकारण्यात आल्याने मोदी सरकारवर (Modi Government) नामुष्की ओढवली आहे. यात नेमकी चूक कुणाची अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पद्म पुरस्का जाहीर करण्याआधी केंद्र सरकार संबंधित व्यक्तीला दूरध्वनी करून त्याची संमती घेते. त्या व्यक्तीने संमती दिल्यानंतरच हा पुरस्कार जाहीर होतो. त्यामुळे पद्म पुरस्कार नाकारण्याचे आतापर्यंत केवळ अपवाद घडले आहेत. यावर्षी तब्बल तीन व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारल्याने सरकारची फजिती झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com