कोरोना लशीचा बूस्टर डोस घ्यायचाय? आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी मुभा

ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने सरकारने कोरोना लशीचा बूस्टर डोस (Booster Dose) देण्याचा निर्णय घेतला आहे.
Covid Vaccination 

Covid Vaccination 

Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा धोका आता वाढू लागला आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. सरकारने विविध विकार असलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लशीचा (Covid Vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) देण्याचा निर्णय घेतला आहे. या नागरिकांना इतर व्याधी असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर न करण्याची मुभा सरकारने जाहीर केली आहे.

ओमिक्रॉनचा धोका वाढू लागताच सरकारने बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती. वैद्यकीय व्यावसायिक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि विविध व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. हा डोस 10 जानेवारीपासून दिला जाईल. दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना हा डोस दिला जाणार आहे. याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोना लस दिली जाणार आहे.

आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा करीत ज्येष्ठ नागरिकांना व्याधी असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करण्यापासून मुभा दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस घेताना व्याधी असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अथवा पत्र सादर करावे लागणार नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना हा डोस घेण्याआधी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर मानून त्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

<div class="paragraphs"><p>Covid Vaccination&nbsp;</p></div>
ओमिक्रॉन विरोधातील लढ्याला बळ! कोरोनावर आणखी दोन लशी अन् गोळीही

तसेच, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लस घेण्यासाठी थेट लसीकरण केंद्रावर जावे लागेल. त्यांनी को-विन अॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. या वयोगटातील मुलांना लस देताना पूर्वीप्रमाणेच लसीकरणाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी ते दुसरा डोस घेण्यास पात्र असतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Covid Vaccination&nbsp;</p></div>
क्रिकेटपटू दिनेश मोंगियासह काँग्रेसचे तीन आमदार आता भाजपच्या पीचवर!

देशात आता 8 कोरोना लशी उपलब्ध झाल्या आहेत. देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, झायकोव्ह-डी, स्पुटनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन्स अँड जॉन्सन, कोर्बेव्हॅक्स आणि कोव्होव्हॅक्स या सहा लशींना परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे. यात आता बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स आणि सिरमच्या कोव्होव्हॅक्स लशीचा समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com