‘...तर भारत जोडो यात्रा तातडीने थांबवा’ : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

यासंबंधीची तक्रार राजस्थानमधील भाजपच्या तीन खासदारांनी केंद्राकडे केली होती.
Mansukh Mandaviya-Rahul Gandhi
Mansukh Mandaviya-Rahul GandhiSarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Corona) नियमांचे पालन भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) करण्यात यावे. नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबविण्यात यावी, अशा आशयाचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी काँग्रेस (Congress) नेते तथा भारत जोडा यात्रा करणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पाठविले आहे. या पत्रात कोरोनाचे कारण दिले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची तक्रार राजस्थानमधील (Rajasthan) भाजपच्या (BJP) तीन खासदारांनी केंद्राकडे केली होती (Union Health Minister's letter to Rahul Gandhi : '...then stop Bharat Jodo Yatra immediately')

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काढलेल्या भारत जोडो यात्रेला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा दक्षिण भारताची सफर संपवून उत्तर भारतात आहे. यात्रेला गर्दीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, भारत सरकारकडून कोरोना नियमांचे कारण सांगून राहुल गांधी यांना पत्र लिहून नियम पाळता येत नसतील तर यात्रा स्थगित करण्यात यावी, अशी सूचना केली आहे.

Mansukh Mandaviya-Rahul Gandhi
माळशिरसमध्ये मोहिते पाटलांचे वर्चस्व कायम; २६ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

राजस्थानमधील पी. पी. चौधरी, निहाल चंद आणि देवजी पटेल या भाजपच्या खासदारांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भारत जोडो यात्रेमुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबरोबरच कोविडपासून देशाला आणि राजस्थानला वाचविण्यासाठी काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Mansukh Mandaviya-Rahul Gandhi
चंद्रकांत पाटलांनी सभा घेतलेल्या गावांत भाजप समर्थक पॅनेलचा धुव्वा : राष्ट्रवादीची बाजी

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सध्या राजस्थानमध्ये असलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये कोविड नियमांचे पालन करण्यात यावे. मास्क आणि सॅनिटायर्झसचा वापर करण्यात यावा. कोविड लसीकरण झालेल्या व्यक्तींनाचा भारत जोडो यात्रेमध्ये प्रवेश देण्यात यावा. तसेच, यात्रेत येण्यापूर्वी आणि यात्रेनंतर संबंधित व्यक्तीने विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक करण्यात यावे.

Mansukh Mandaviya-Rahul Gandhi
वेल्ह्यात काँग्रेसची सरशी : तालुकाध्यक्षाच्या गावातच राष्ट्रवादीचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत

कोविड महामारीच्या या नियमांचे पालन करता येत नसेल तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (Public Health Emergency) ची परिस्थिती लक्षात घेऊन देशाच्या हितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात यावी, अशी सूचनाही आरेाग्य मंत्री मांडविया यांनी केली आहे. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Mansukh Mandaviya-Rahul Gandhi
बारामतीत धक्कादायक निकाल : राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षाचा तरुणाकडून दारुण पराभव

दरम्यान, या पत्रामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोरोनाचे कारण दाखवून भारत जोडो यात्रा थांबवणार का? असा सवाल काँग्रेसकडून विचारला जात आहे. तसेच यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाची की कोरोनाची भीती वाटते आहे, असा प्रश्नही काँग्रेस नेत्यांकडून विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in