कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कसं वाढवलं? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा अखेर खुलासा - union health minister harsh vardhan clarifies about gap between two doses of covishield | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कसं वाढवलं? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा अखेर खुलासा

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील (Dose) अंतर वाढवले आहे. सरकारने तज्ञांचे मत न घेता हे अंतर परस्पर वाढवले, असा आरोप झाल्याने मोठा गदारोळ उडाला आहे. अखेर या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी खुलासा केला आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे की, कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर शास्त्रीय आधारावर वाढवण्यात आले आहे. हा निर्णय पारदर्शीपणे घेण्यात आला आहे. सर्व माहितीची मूल्यमापन करण्याची भारताकडे वेगवान कार्यपद्धती आहे. अशा महत्वाच्या विषयावरुन राजकारण करणे हे अतिशय दुर्दैवी आहे. 

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने तज्ञांशी सल्लामसलत न करता घेतल्याचे समोर आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे माजी संचालक ए.डी.गुप्ते यांनीही हाच दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, सरकारने केवळ दोन डोसमधील अंतर 8 ते 12 आठवडे वाढवण्याबाबत आमच्याशी चर्चा केली होती. याला आम्ही सहमतीही दर्शवली होती. परंतु, सरकारने परस्पर हे अंतर 12 ते 16 आठवडे वाढवले. 

हेही वाचा : ब्रिटनचं पाहून भारतानं कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं! 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख