Ukraine-Russia War च्या झळा भारतालाही बसणार; पेट्रोल-डिझेलची भाववाढ अटळ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींनी १०० रूपये प्रती बॅरलचा टप्पा पार केला. गेल्या ८ वर्षांतील हा तेलाचा उच्चांकी दर आहे.
 petrol & diesel prices
petrol & diesel pricesSarkarnama

नवी दिल्ली : भारतापासून हजारो किलोमीटरवर रशिया व युक्रेनमध्ये भडकलेल्या युध्दाच्या (Ukraine-Russia War) ज्वाळांचा दाहक चटका सर्वसामान्य भारतीयांनाही जाणवणार हे निश्चित आहे. पेट्रोल-डिझेलच्या (petrol & diesel prices) आंतरराष्ट्रीय बाजारात आताच डॉलरमागे शतकाच्या पुढे भडकलेल्या विक्रमी किंमतींनी त्याची पहिली झलक दाखवून दिली आहे. उत्तर प्रदेशासह विधानसभा निवडणुकांमुळे मोदी सरकारने (Central Government) गेले १०० दिवसांहून अधिक काळ रोखून धरलेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतवाढीच्या ज्वाळाही लवकरच तुमच्या आमच्या उंबरठ्यावर येण्याचा सांगावा मिळाला आहे.

 petrol & diesel prices
Ukraine-Russia War : परिस्थिती चिंताजनक मात्र भारतीयांच्या मुक्ततेसाठी अजूनही मार्ग खुला

निवडणुकीत पाच राज्यांत एखादा पक्ष जिंकेल व दुसरा पराभूत होईल मात्र, जास्तीत जास्त ७ मार्चची तारीख येता येता या पाचही राज्यांसह देशभरात कंबरतोड महागाई आणि महागाईच स्पष्ट बहुमताने (थंपिंग मेजॉरिटी) विजयी होणार यात जाणकारांना शंका नाही. जागतिक दबावाला न जुमानता रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतीन यांनी आज युक्रेनवर हल्ला चढविताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींना जणू आग लागली आणि या किमतींनी १०० रूपये प्रती बॅरलचा टप्पा पार केला. गेल्या ८ वर्षांतील हा तेलाचा उच्चांकी दर आहे.

रशिया हा जगातील क्रमांक २ चा तेल उत्पादक आणि अग्रक्रमावरील नैसर्गिक वायू उत्पादक देश असल्याने नजिकच्या काळात या किमती १५० रूपये प्रती बॅरलपर्यंत जाण्याची भिती व्यक्त होते. साहजिकच साऱ्या जगभरात महागाईच्या ज्वाळा भडकण्याचे गृहीत धरले जात आहे. भारत या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही.

 petrol & diesel prices
video : युक्रेन सीमेवर रशियाचे 1 लाख सैन्य उभे

जागतिक बाजारात कच्चे तेल १ डॉलरने महागले तरी भारतात पेट्रोल डिझेल साधारणतः किमान ४० पैशांनी महाग करावेच लागते. हा हिशोब गृहीत धरला तर गेल्या जेमतेम आठवडाभरात तेलाच्या किमतींनी ३० ते ३५ डॉलरची झेप घेऊन आधी ९५ व आता १०० डॉलर प्रती बॅरलचा टप्पा गाठला असेल तर देशांत पेट्रोलियम पदार्तांचे दर तातडीने प्रतीलीटर ८ ते १० रूपयांनी वाढविणे अपेक्षित आहे.

यूपी निवडणुकीची जादू म्हणून मोदी सरकारने हे दर सध्या रोखून धरले आहेत. ४ नोव्हेंबरला केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत कपात केली व नंतर हे दर स्थिर आहेत. ज्या दिवशी (७ मार्च) अखेरचे मतदान होईल त्या दिवशी पेट्रोलियम पदार्थ महागणार हे सर्वसामान्यांनाही उमगते. मात्र, सध्याची जागतिक भाववाढीची परिस्थिती पहाता ७ मार्चपर्यंत थांबणे तरी सरकारला 'प्रॅक्टीकली' शक्य होईल का याबाबत शंका व्यक्त केली जाते. आॅक्टोबर २०२१ अखेर देशात पेट्रोल ११० रूपये तर डिझेल ८५-८७ रूपये प्रतीलीटर होते. निवडणुकीची जादू संपताच पेट्रोल डिझेलची अटळ दरवाढ सर्वसामान्य आम आदमीचा खिसा कापणार यातही कोणाला शंका नाही.

 petrol & diesel prices
Supriya Sule यांना CM करण्याच्या हालचाली, या चंद्रकांतदादांच्या दाव्यावर त्या म्हणाल्या...

गेल्या ५ वर्षांत खाद्यतेल सरासरी ६० ते ६५ रूपये प्रतीलीटर, तांदूळ ८ ते १० रूपये व डाळी १५ ते २० रूपये प्रतीकिलो या दराने महागल्या आहेत. हे किमान आकडे आहेत. ही वाढ जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थांपासून साबण, वॉशिंग पावडर, फ्रीज, पॉशिंग मशीन, पेंटस्‍, लॅपटॉप या वस्तूंपर्यंतही पोहोचण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com