युक्रेनचं मोठं यश! रशियाच्या सैन्याला सीमेपर्यंत मागं पिटाळलं

देशाच्या इतर भागांतही युक्रेनचा प्रतिकार तीव्र
Russia-Ukraine War updates
Russia-Ukraine War updates Sarkarnama

किव्ह : युक्रेनच्या (Ukraine) सैन्यानं आज खारकिव्ह भागात मोठे यश मिळवलं. युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या (Russia) सैन्याला सीमेपर्यंत मागे ढकललं आहे. या विजयामुळे युक्रेनच्या सैन्याचं मनोबल वाढलं आहे. यानंतर देशाच्या इतर भागांतही युक्रेनचा प्रतिकार तीव्र झाला आहे. (Russia-Ukraine war updates)

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हमधून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात युक्रेनच्या सैन्याला काही दिवसांपूर्वी यश आलं होते. आज त्यांनी रशियन फौजांना देशाच्या सीमेपर्यंत मागे ढकललं. सीमेवरील ठाण्याजवळ युक्रेनी सैनिक जमा झाल्याचा व्हिडिओही जाहीर करण्यात आला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने या सैनिकांचे अभिनंदन केले आहे.

Russia-Ukraine War updates
काशीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलं शिवलिंग; जागा तातडीनं सील

खारकिव्ह भागात विजय मिळाल्याने येथील सैनिकांना पूर्वेकडे पाठविण्याचा युक्रेन सरकारचा विचार सुरू आहे. मात्र, देशाच्या उत्तर सीमेवर रशियाचा मित्र असलेल्या बेलारुसचे सैन्य सज्ज असल्याने युक्रेनला याबाबत फेरविचार करावा लागणार आहे. दरम्यान, युक्रेनच्या पूर्व भागात मात्र रशियाचे जोरदार हल्ले सुरु आहेत. लुहान्स्क भागात रशियाने तोफगोळ्यांच्या मारा केला. यात दोन जण ठार, तर नऊ जण जखमी झाले. दोन्तेस्क भागातही रशियनाने नागरी वस्त्यांवर हल्ले केले.

Russia-Ukraine War updates
राजकारण तापलं! राज्यपालांनी सरकारला झापलं अन् थेट मुख्य सचिवांना दिला आदेश

मॅकडोनाल्ड्सचा रशियाला रामराम

सोविएत महासंघाने तीस वर्षांपूर्वी शीतयुद्धानंतर जागतिक कंपन्यांसाठी दरवाजे खुले केले होते. त्यावेळी रशियात व्यवसाय सुरु केलेल्या मॅक्डोनाल्ड कंपनीने आता रशिया कायमस्वरुपी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील मानवाधिकारांची ढासळती स्थिती आणि बेभरवशाचे वातावरण यामुळं कंपनीनं हे पाऊल उचललं आहे. कंपनीनं मार्च महिन्यात रशियातील आपली ८५० हॉटेल तात्पुरती बंद केली होती. फ्रान्समधील वाहन निर्मिती कंपनी असलेल्या रेनॉल्टनेही रशियातील शाखा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com